Shraddha Kapoor Eetha Teaser Out: ‘नाचता नाचताच प्रसूतीकळा, नाळ ठेचत…’, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा टीजर हादरवून टाकतो; ‘तो’ सीन काळीज चिरतो…


Eetha Shraddha Kapoor Film Teaser: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Lakshman Utekar) आता मनोरंजन सृष्टीतील एक मोठं नाव झालं आहे. गेल्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपटामुळे प्रत्येकाच्या तोंडी असलेल्या या दिग्दर्शकाच्या आणखी एका बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. ते आता महाराष्ट्राच्या लावणीच्या इतिहासातील विठाबाई भाऊ नारायणगावकर ( Vithabai Narayangaonkar) यांच्या आयुष्यावर आधारित ‘ईठा ‘ (Eetha) हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटात श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) प्रमुख भूमिकेत दिसणार असून रणदीप हुडाची (Randeep Huda) ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा जबरदस्त टिझर सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलाय. हा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली आहे. लावणीच्या कार्यक्रमात विठाबाई नारायणगावकर यांना प्रसूतीकळा सुरू होत असतानाचा एक सीन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Eetha Teaser Out: ईठा चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ईठा या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात फडाबाहेर हजारो प्रेक्षकांची गर्दी फक्त विठाबाईंना पाहण्यासाठी आलेली. फड खचाखच भरलेला. स्टेजवर लावणी सादर करण्यासाठी सगळ्या नृत्यांगना येतात. पण विठाबाई दिसत नाहीत, त्यामुळे प्रेक्षकांमधून विठाबाईंना बोलवा अशा हाका सुरू होतात. या सगळ्या गोंधळात विठाबाईंना प्रसूतीकळा सुरू होतात. सादरीकरण न थांबवता, शांतपणे त्या रंगमंचाच्या मागे जातात. दगडाच्या साहाय्याने नाळ ठेचतात आणि पुन्हा आपला कार्यक्रम सुरू करतात. हा सीन पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा हा आगळा वेगळा अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. या टीझरवर प्रेक्षक भरभरून कमेंट्स करत आहेत. 

 

 

कोण होत्या विठाबाई नारायणगावकर?  

तमाशाच्या वर्तुळातलं एकेकाळी प्रचंड चर्चेत असलेलं आणि गाजलेलं नाव म्हणजे विठाबाई नारायणगावकर. वयाच्या 10व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकुमत गाजवणारी लावणी नृत्यांगना. सावळा देखणा चेहरा, गोड गळा आणि अभिनय अशा तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या जीवनचरित्राची भुरळ जनसामान्य रसिकांना पडणे तसे स्वाभाविक होते. विठाबाई गरोदर असताना नवव्या महिन्यात नाचण्यासाठी उठल्या आणि नाचता नाचता पोटात कळा येऊ लागल्याने रंगमंचामागे गेल्या. तिथेच बाळंत झाल्या आणि नाळ दगडाने ठेचून प्रेक्षकांच्या आग्रहास्तव पुन्हा स्टेजवर नाचण्यासाठी आल्या.

स्व. विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म तमाशाच्या वातावरणात झाला. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वाहून दिलं. त्यांना आपल्या कारकि‍र्दीत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रद्धा कपूर अभिनीत आगामी चित्रपट, महाराष्ट्रीयन लोककलाकार विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. हा बायोपिक महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास आणि 1950 ते 1980 च्या दशकातील तमाशा या कलाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातोय. ईठा हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *