Vaibhav Sooryavanshi: असं होणं सामान्य…वैभवसोबतच्या राड्यावर श्रीलंकन कॅप्टन नको ते बरळला; फायनलपूर्वी पुन्हा एकदा दिली वॉर्निंग – Marathi News | Sri lanka a captain sahan arachchige denied targeting vaibhav sooryavanshi ahead of upcoming final against india a


भारत ‘अ’ आणि श्रीलंका यांच्यातील तिरंगी मालिकेचा अंतिम सामना रविवार, 21 जून रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ डांबुला क्रिकेट स्टेडियमवर खेळतील. या मालिकेत भारत ‘अ’ आणि श्रीलंका तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येत आहेत. मागील साखळी सामन्यात श्रीलंकेने भारत ‘अ’ संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. या सुपर ओव्हरदरम्यान वैभव सूर्यवंशी एका जोरदार वादात अडकला. वैभववर अनेकांनी टीकाही केली तर अनेकांनी वैभवची बाजूही घेतली. या वादाची चर्चा मात्र सर्वत्र जोरदार रंगलेली दिसली. तर आता प्रकरण इतके चिघळल्यानंतर श्रीलंका ‘अ’ संघाचा कर्णधार सहन अरात्चिगेने या प्रकरणी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

श्रीलंका ‘अ’ संघाच्या कर्णधाराने म्हटले आहे की, “रविवारी भारत ‘अ’ संघाविरुद्ध होणाऱ्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यादरम्यान त्याचा संघ वैभव सूर्यवंशीला लक्ष्य करणार नाही. “श्रीलंका ‘अ’ संघाने अफगाणिस्तान ‘अ’ संघाला 103 धावांनी पराभूत करून भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे. अरात्चिगेने मागील सामन्यादरम्यान सूर्यवंशीसोबत झालेल्या मैदानातील वादावरही भाष्य केले आणि तणावपूर्ण सामन्यात ही एक सामान्य घटना असल्याचे म्हटले.

सुपर ओव्हरच्या शेवटच्या तीन चेंडूंवर 14 धावांचा पाठलाग करताना, वैभव सूर्यवंशी आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही आणि त्याचा श्रीलंका ‘अ’ संघाच्या खेळाडूंशी जोरदार वाद रंगला. विशन हलमगेसोबत मैदानात जोरदार राडा झाला. एकमेकांसोबत धक्कबुक्की पण झाली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

मात्र, अराचिगेने स्पष्ट केले की, “माझा संघ त्या घटनेतून पुढे गेला आहे. मुले कोणालाही किंवा कशालाही लक्ष्य करत नाहीत. आम्ही फक्त आमच्या खेळाचा आनंद घेत आहोत. सुपर ओव्हरसारख्या अटीतटीच्या सामन्यात भावना व्यक्त होणे स्वाभाविक आहे. हे सामान्य आहे.”

दरम्यान, पंच प्रदीप जयप्रकाश यांनी मैदानातील गैरशिस्तीवर कठोर भूमिका घेतली असून श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज विशन हलमगेला दंड ठोठावला आहे. दोन्ही खेळाडूंना वेगळे करण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या श्रीलंकेचा वरिष्ठ खेळाडू निरोशन डिकवेला यालाही नियमभंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. वृत्तानुसार, विशन हलमगे केवळ याच सामन्यात नव्हे, तर 9 जून रोजी झालेल्या दोन्ही संघांमधील मागील सामन्यातही वैभव सूर्यवंशीला वारंवार स्लेजिंग करत होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *