Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने दिवाळीआधीच होणार धमाका; वृषभसह 4 राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, शनिच्या कर्माचं फळ


Shani Vakri 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा 27 जुलै 2026 रोजी कर्मफळदाता शनि देव (Lord Shani) मीन राशीत वक्री होणार आहे. शनि या अवस्थेत 11 डिसेंबर 2026 च्या सकाळी 3 वाजून 51 मिनिटांर्यंत स्थित असणार आहे. शनिची ही वक्री चाल फार महत्त्वाची मानली जाते. कारण यामुळे राशींना मनाप्रमाणे लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर, जीवनात चांगला बदल दिसणार आहे. तसेच, अनेक शुभ योगदेखील जुळून येणार आहेत. याचा लाभ कोणकोणत्या राशींना (Zodiac Signs) होणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

या राशीचा स्वामी ग्रह शनि भाग्याच्या स्थानी आहे. म्हणजेच, नवव्या आणि दहाव्या चरणात आहे. शनिच्या वक्रीमुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल. करिअरचे नवे पर्याय निर्माण होतील. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, उत्पन्नाचे नवे सोर्स निर्माण होतील. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानाचा स्वामी शनि पाचव्या चरणात वक्री होणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या जाणवणार नाहीत. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसेल. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या तिसऱ्या चरणात शनि वक्री होणार आहे. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नाशी संबंधित गोष्टींवर विचार करण्याची गरज नाही. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार वाढेल. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, या कालावधीत छोटे-मोठे प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला तुमची अनेक कामे सहजरित्या पूर्ण करता येतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

या राशीच्या पहिल्या चरणात शनि वक्री होणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगला बदल दिसून येईल. तसेच, काही नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आहेत. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :                    

Garud Puran : दागिने, कपडे, घड्याळ…मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर करावा की करु नये? गरुड पुराणात काय म्हटलंय…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *