माजलगाव (बीड): बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. माजलगाव नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका रेखा सरोदे (माहेरचे नाव – रेखा अंकुश अंबुरे) यांचे ‘मराठा कुणबी’ जात प्रमाणपत्र जिल्हा जात (Beed NCP Corporator) पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. एवढेच नव्हे तर समितीने हे प्रमाणपत्र तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे आता रेखा सरोदे यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून यामुळे माजलगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.(Beed NCP Corporator)
Beed NCP Corporator : सुमन मुंडेंच्या तक्रारीनंतर चौकशीचा ससेमिरा
नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक १ मधून मागास महिला प्रवर्ग आरक्षित जागेवर रेखा सरोदे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांनी निवडणुकीसाठी सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र खोटे आणि चुकीच्या पुराव्यांच्या आधारे मिळवले असल्याचा आक्षेप सुमन मुंडे यांनी घेतला होता. मुंडे यांनी यासंदर्भात थेट जिल्हा जात पडताळणी समितीकडे रीतसर तक्रार दाखल करून पुराव्यांसह आव्हान दिले होते. या तक्रारीनंतर समितीने दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि कागदपत्रांची कसून पडताळणी केली.(Beed NCP Corporator)
Beed NCP Corporator : शालेय उताऱ्यावर ‘कुणबी’ नोंदच नव्हती!
जात पडताळणी समितीच्या चौकशीत रेखा सरोदे यांच्या जातीबाबतचे अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सरोदे यांच्या खळवट लिमगाव येथील मूळ शालेय उताऱ्याची (School Leaving Record) तपासणी केली असता, त्यावर केवळ ‘हिंदू’ किंवा ‘हिंदू मराठा’ अशी नोंद आढळून आली. संपूर्ण शालेय रेकॉर्डमध्ये कुठेही ‘कुणबी’ असा उल्लेख नव्हता.
Beed NCP Corporator : १५ किमी दूरच्या व्यक्तीला दाखवले ‘खापर पंजोबा’
शालेय उताऱ्यावर कुणबी नोंद नसल्यामुळे रेखा सरोदे यांनी आपली कुणबी जात सिद्ध करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली होती. त्यांनी त्यांच्या गावापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुप्पा गावचे रहिवासी ‘यशवंत संभाजी’ नावाच्या व्यक्तीला आपले ‘खापर पंजोबा’ दाखवले आणि त्यांच्या जुन्या कुणबी नोंदीचा गैरफायदा घेत स्वतःचा कुणबी दाखला पदरात पाडून घेतला.
Beed NCP Corporator : दुसऱ्या कुटुंबाच्या पुराव्यांची चोरी उघडी!
समितीने जेव्हा सखोल तपास केला, तेव्हा उघड झाले की, यशवंत संभाजी हे प्रत्यक्षात तिथल्या स्थानिक ‘सावंत’ आडनावाच्या कुटुंबाचे पूर्वज आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, याच यशवंत संभाजी यांच्या पुराव्यांच्या आधारावर पृथ्वीराज दादासाहेब सावंत यांना आधीच जात वैधता प्रमाणपत्र (Validity) मिळालेले आहे. त्यामुळे सरोदे यांनी दुसऱ्याच कुटुंबाच्या पूर्वजांचा पूर्वग्रहदूषित वापर केल्याचे सिद्ध झाले.
Beed NCP Corporator : नगरसेवक पद जाणार?
शालेय रेकॉर्डमधील तफावत आणि चुकीच्या व्यक्तीला पूर्वज दाखवून मिळवलेला कुणबी दाखला यामुळे जिल्हा जात पडताळणी समितीने रेखा सरोदे यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवून ते जप्त केले आहे. आरक्षित जागेवर निवडणूक लढवण्यासाठी मूळ जात प्रमाणपत्रच अवैध ठरल्याने, आता कायद्यानुसार रेखा सरोदे यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या धक्क्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजलगावच्या स्थानिक राजकारणात कोणत्या हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे