Garud Puran : सनातन हिंदू धर्माच्या मुख्य 18 पुराणांपैकी एक म्हणजेच गरुड पुराण. भगवान विष्णूंच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं एक गूढ पुराण आहे. यामध्ये जीवन, मृत्यू आणि जन्माशी संबंधित अत्यंत गूढ रहस्यांचं वर्णन करण्यात आलं आहे.
गरुड पुराणात व्यक्तीच्या जीवन-मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यानुसार, या ठिकाणी आपण व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वस्तूंचा वापर करावा की करु नये या संदर्भात जाणून घेणार आहोत.
अनेकदा लोक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या वस्तू जसे की, कपडे, बूटं, दागिने यांसारख्या गोष्टी आठवणी म्हणून जपून ठेवतात आणि काही काळानंतर त्यांचा वापर करतात. गरुड पुराणात या संदर्भात सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.
काय सांगितलंय गरुड पुराणात?
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची आत्मा नवीन प्रवासाला निघते असं गरुड पुराणात सांगितलंय. मात्र, त्यात असाही उल्लेख करण्यात आला आहे की, मृत्यूच्या काही काळापर्यंत आत्मा आपल्या जुन्या आयुष्याशी, त्याच्या संबंधित नात्यांशी तसेच वस्तूंशी संलग्न असते. याचाच अर्थ असा होतो की, या सगळ्यांबाबत आत्म्याला काही काळ मोह असतो. अशातच, जर तुम्ही त्यांच्या वस्तूंचा वापर केलात तर त्या आत्म्याचा मोह आवरायला फार कालावधी लागतो.
‘हे’ नुकसान होण्याची शक्यता
गरुड पुराणात असं सांगण्यात आलं आहे की, जर तुम्ही मृत व्यक्तीच्या वस्तूंचा वापर केलात तर याने पितृ नाराज होण्याची शक्यता असते. याच कारणामुळे घरात पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर, मृत व्यक्तीच्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो. ज्याचा वापर केल्यास त्या वापर करणाऱ्या व्यक्तीवर देखील परिणाम होऊ शकतो असं मानण्यात आलं आहे.
‘या’ वस्तूंचा वापर करु नका
मृत व्यक्तीचे दागिने, कपडे, बूटं-चपला आणि घड्याळ यांसारख्या वस्तूंचा वापर करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकतं. या सर्व वस्तूंच्या वापराने तुमच्यामध्ये नकारात्मकता वाढू शकते. तसेच, याचा व्यक्तीच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर थेट परिणाम होतो. पण, जर मृत व्यक्ती जिवीत असताना जर तुम्हाला ते दागिने भेट म्हणून मिळाले असतील, दान केले असतील तर अशा स्थितीत तुम्ही दागिने वापरु शकता. याचा कोणताच दोष लागत नाही.
‘हे’ कार्य नक्की करा
मृत व्यक्तीच्या वस्तूंचं शुद्धीकरण केल्यानंतर एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. जर तुम्हाला दान करायचं नसल्यास त्या वस्तू एखाद्या नदीत विसर्जित करु शकता. यामुळे देखील तुमच्या आयुष्यात सकारात्मकता टिकून राहील. तसेच, मृत व्यक्तीच्या आत्म्याला देखील शांती मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Vat Purnima 2026 : लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसाल? वाचा साड्यांचे रंग आणि त्यांचं महत्त्व
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे