Sushma Andhare Shivsena Vardhapan Din: कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव, प्रतिमेला जोडे मार; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल


Sushma Andhare and Krishna Ashtikar: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा फुटीर खासदारांपैकी एक असलेल्या नागेश आष्टीकर पाटील (Nagesh Ashtikar Patil) यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर (Krishna Ashtikar) यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबत असल्याचा दावा केला आहे. मी माझ्या वडिलांच्या संपर्कात नाही, त्यांच्या शिंदे सेनेत जाण्याच्या निर्णयाविषयी मला कोणतीही कल्पना नव्हती, असे कृष्णा आष्टीकर यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी कृष्णा आष्टीकर यांना आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी स्वत:च्या वडिलांचे पिंडदान करुन दाखव, असे आव्हान दिले. त्या शुक्रवारी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Shivsena Vardhapan Din)

यावेळी सुषमा अंधारे यांना कृष्णा आष्टीकर यांच्या अजूनही ठाकरे गटात असल्याच्या दाव्याविषयी विचारण्यात आले. कृष्णा आष्टीकर हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असेल त्याने उद्या बापाचं पिंडदान करुन दाखवावं आणि स्वत:च्या बापाच्या प्रतिमेला जोडे मारुन दाखवावेत, मग आम्ही म्हणू की, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहात. तुम्ही कोणाला शहाणपण शिकवताय. बाप तसा बेटा आहे, अशी आगपाखड सुषमा अंधारे यांनी केली.

शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणावेळी, ‘माझ्या नेतृत्त्वाबाबत होणाऱ्या आरोपात तुम्हाला तथ्य वाटत असेल तर मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे’, असे म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांना धक्का बसला. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख पद सोडू नये, अशी विनंती त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा हा प्रस्ताव ऐकून सुषमा अंधारे यादेखील प्रचंड भावूक झालेल्या पाहायला मिळाले. आम्ही उद्धव ठाकरे यांना नेता मानलं आहे, ते आम्हाला सांगू शकत नाहीत की, पक्षप्रमुख पदाचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीला द्या. आम्ही त्यांच्यासोबत लढायला तयार आहोत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल मला जास्त वाईट वाटतं, ज्याला आम्ही आपलं मानलं ज्याच्यासाठी आम्ही लढलो, तो निघून गेला. एकदा विकलेले हे पुन्हा पुन्हा विकले जातात. उद्या अमित शहांनी मोठी बोली लावली तर हे सहा खासदार त्यांच्याकडे जातील.   तुझ्याकडे भुंकणारे लोक आहेत. पण माणसं निवडून आणणारे नाहीत. आम्ही ब्रँड तयार करणारे आहोत, अशी टीका सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर केली. 

देवेंद्र फडणवीस हे गावठी चाणक्य नाहीत, जे एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील. विश्वास कोणावर ठेवायचा हे देवेंद्र फडणवीस यांना मला वाटतं माहित असेल, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.

Shivsena Crisis: सुषमा अंधारेच्या बोलघेवडेपणामुळे पक्ष फुटीच्या वाटेवर, आम्हाला पैशांची गरज नाही – कृष्णा पाटील आष्टीकर

सुषमा अंधारेच्या बोलघेवडेपणामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असा पुनश्च एकदा आरोप कृष्णा पाटील आष्टीकर यांनी केलाय. शिवसेनेचे बंडखोर खासदार नागेश पाटील यांचे चिरंजीव असलेल्या कृष्णा यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केलाय. तसेच नागेश पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही देखील प्रयत्न करत आहोत. त्यांनी हे बंड का केले याची आम्हालाही कल्पना नाही. तसेच पैशांची आम्हाला आवश्यकता नाही, असेही आष्टीकर यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

Operation Tiger UBT Shivsena Nagesh Ashtikar Patil: नागेश आष्टीकरांचा मुलगा सुषमा अंधारेंवर संतापला, म्हणाला, ‘तुमच्यासारख्या नेत्यांचा वीट…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *