Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले,आता सहन करणार नाही, खासदार फुटीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया


Omraje Nimbalkar and Aaditya Thackeray: उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे वक्तव्य करणारे ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यासहित अन्य फुटीर खासदारांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करुन जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये थेट ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेतले नसले तरी शिंदे गटात जाण्यासाठी वेगवेगळी कारणे देणाऱ्या खासदारांना त्यांनी लक्ष्य केले आहे. (Maharashtra Politics news)

आज आपला 60 वा वर्धापन दिन! पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती 2024 मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Operation Tiger: उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं, म्हणाले…

मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा विचार केला तर निर्णय चुकीचा वाटतो. मात्र, राजकीयदृष्ट्या विचार केला तर बरोबर आहे. आम्ही खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी म्हटले. तर मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नाहीत, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

Uddhav Thackeray-Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकरांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत, धाराशिवमधील बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *