पुण्यात विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या 2 स्कूल बसची अचानक जोरदार धडक, सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर एकाच शाळेच्या दोन स्कूल बसची एकमेकांना जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुण्यात स्कूल बसचा अपघात
पुण्यात स्कूल बसचा अपघात

पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर एकाच शाळेच्या दोन स्कूल बसची एकमेकांना जोरदार धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अत्यंत समाधानाची बाब म्हणजे दोन्ही बसमधील सर्व विद्यार्थी सुदैवाने पूर्णपणे सुखरूप आहे. यामुळे होणारी एक मोठी दुर्घटना टळली आहे.

दोन्ही बस एकमेकांना धडकल्या

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरून जात असताना अचानक एकाच शाळेच्या दोन बस एकमेकांवर आदळल्या. अपघात झाला तेव्हा दोन्ही गाड्यांमध्ये शाळकरी मुले प्रवास करत होती. धडक बसताच विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. परंतु, कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत न झाल्याने पालकांनी आणि शाळा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

अपघात झाल्यानंतर दोन्ही मोठ्या स्कूल बस रस्त्याच्या मधोमध थांबल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला. या घटनेनंतर काही वेळातच रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कामावर जाण्याच्या वेळेतच हा खोळंबा झाल्यामुळे नोकरदार आणि इतर वाहनचालकांना ताटकळत उभे राहावे लागले.

घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले असून, अपघाताग्रस्त बस बाजूला सारून रस्ता मोकळा करण्याचे आणि वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. स्कूल बसच्या चालकांनी वाहने चालवताना अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.

मराठी बातम्या/पुणे/

पुण्यात विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या 2 स्कूल बसची अचानक जोरदार धडक, सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *