Omraje Nimbalkar Operation Tiger UBT Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ठाकरे गटाचे सहा खासदार त्यांच्या गळाला लागले. या सहा फुटीर खासदारांमध्ये संजय दिना पाटील, संजय देशमुख,संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. यापैकी ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी ठाकरेंची साथ सोडून जाणे सामान्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मनाला सर्वाधिक लागले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांना प्रचंड सुनावले होते. निष्ठा काय असते, याच धडे दिले होते. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील (Kailas Patil) हे दोन ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत सरदार म्हणून ओळखले जात होते. मात्र, आता ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ओमराजे निंबाळकर हे नॉट रिचेबल झाल्यानंतर त्यांचा पत्ता शोधण्यासाठी सगळ्यांच्या नजरा सर्वात आधी त्यांचे जिगरी मित्र असणाऱ्या कैलास पाटील यांच्याकडे वळल्या होत्या. मात्र, कैलास पाटील यांनी आपल्या ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले होते. (Maharashtra Politics news)
कैलास पाटील यांनी शुक्रवारी एबीपी माझाशी बातचीत केली. त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्याशी तुमचे काही बोलणे झाले का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कैलास पाटील यांनी म्हटले की, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी अजूनही माझा संपर्क झालेला नाही. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मी जात आहे, प्रमुख पदाधिकारी आम्ही जात असतो. उद्या मुंबईत आमदार, जिल्हाप्रमुख , संपर्कप्रमुख यांची बैठक बोलावली आहे. पक्षप्रमुख काय सूचना देतात त्यानुसार पुढील रणनीती असणार, असे कैलास पाटील यांनी सांगितले.
Uddhav Thackeray news: सहा फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील नेत्यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं, खास सूचना देणार
फुटलेल्या खासदारांच्या मतदार संघातील सर्व जिल्हाप्रमुख विभाग प्रमुख आणि महत्त्वाच्या पदाधिकारी नेत्यांची उद्या उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलवली आहे. उद्या साडेबारा वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे पदाधिकार्यांना सूचना देणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला सर्व सहा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख आणि विभागप्रमुख हजर असतील.
आणखी वाचा
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report