IND vs AFG 3rd ODI : मालिका जिंकली तरी BCCI शांत बसेना; टीम इंडियात मोठे बदल, नव्या Squad लिस्टमधून मॅचविनर OUT, तर अचानक हर्षित राणा IN…


Harshit Rana Joins India Squad : भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2−0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवार 20 जून रोजी होणार आहे. या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघात अचानक दोन मोठे बदल केले आहेत. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाची संघात एन्ट्री झाली आहे, तर स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला संघातून बाहेर पडावे लागले आहे.

दुखापतीनंतर हर्षित राणाचे संघात पुनरागमन (Harshit Rana Joins India Squad)

आयपीएल दरम्यान दुखापतग्रस्त झाल्यामुळे हर्षित राणाला कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळता आले नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो तंदुरुस्त होत असल्याच्या बातम्या येत होत्या. अखेर बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली आहे की, हर्षितने सेंटर ऑफ एक्सीलेंस (CoE) मध्ये आपले पुनर्वसन (Rehabilitation) यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. निवड समितीने त्याला तिसऱ्या वनडेसाठी संघात स्थान दिले असून तो चेन्नईमध्ये भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. आगामी सामन्यात त्याच्या फिटनेसची चाचणी घेण्यासाठी त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

हार्दिक पांड्याची जुनी दुखापत बळावली? (Hardik Pandya Update)

दुसरीकडे, हार्दिक पांड्याला अपडेटेड संघातून वगळण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त असल्याच्या अटीवरच त्याला सुरुवातीला संघात स्थान मिळाले होते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून (NCA) त्याला हिरवा कंदीलही मिळाला होता, परंतु अचानक त्याची जुनी दुखापत पुन्हा उफाळून आल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत अधिकृत वक्तव्य केले नसले तरी, अपडेटेड स्क्वॉडमधून त्याचे नाव हटवले गेले आहे.

तिसऱ्या वनडेसाठी अपडेट भारतीय संघ (Indian Squad Update 3rd ODI) :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, यशस्वी जयस्वाल, हर्षित राणा.

हे ही वाचा –

कोचपदावरून गंभीरला आधी हकला…; भर लाईव्ह कॅमेऱ्यासमोर टीम इंडियाचा वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला, नको नको ते बोलला





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *