ठाकरेंच्या खासदारांनंतर थेट फुटणार शरद पवार गटातील तब्बल इतके खासदार, थेट तारीखही पुढे.. – Marathi News | Claim that 5 MP from the Sharad Pawar faction of the NCP are breaking away comes as blow to Sharad Pawar


उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. राज्यातील राजकारणात भूकंप आला. हेच नाही तर या खासदारांनी स्वतंत्र गट देखील तयार केला. त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. ही शिवसेनेत मोठी खिंडार आहे. दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे. ठाकरे गटातील हे 6 खासदार आजच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशा चर्चा आहेत. शिंदेंचे ऑपरेशन टायगर यशस्वी झाले. संजय राऊत यांनी काही गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे यांना हा थेट धक्का आहे, कारण एकाच वेळी 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली. यादरम्यानच शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याही पक्षात मोठी बंडखोरी होणार असल्याचा दावा करण्यात आला, ज्याने खळबळ उडाली.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून तब्बल 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. थेट त्यांनी तारीखही सांगून टाकली. त्यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे 5 खासदार 12 डिसेंबरपर्यंत आमच्याकडे येऊ शकतात. फक्त खासदारच नाही तर आमदारही येऊ शकतात, असे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादी पक्षात येण्यास शरद पवार यांच्या गटातील खासदार आणि आमदार इच्छुक आहेत. ऑपरेशन करावे लागेल, असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे मोर्चा निघाला का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांच्या गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील खासदार येऊ शकतात असा दावा थेटपणे करण्यात आला.

त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, आम्ही ऑपरेशन वगैरे काही करणार नाहीत, ते स्वत: तुतारीवाले करतील. 5 खासदार आमच्याकडे येऊ शकतात. सर्वांना कामे करणे गरजेचे आहे, जर त्यांना पुढे निवडून यायचे असेल तर. यादरम्यानच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनंतर शरद पवारांचाही पक्ष फोडणार का? यावर जोरदार चर्चा रंगतना दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *