त्रासलेला चेहरा… मिटिंगमधून बाहेर पडताच अनिल देसाई यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले, आता… – Marathi News | Shiv Sena (UBT) Split Fear : Missing MPs to Face Action, Desai’s Grim Reaction


ठाकरे गटाने आज दिल्लीत संसदीय दलाची बैठक बोलावली होती. या बैठकीला नऊपैकी सहा खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे ठाकरे गटाचे हे सहाही खासदार फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हीप असूनही खासदार आले नाहीत. त्यामुळे ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाची दीड तास बैठक झाली. या बैठकीनंतर ठाकरे गटाचे संसदेतील मुख्य प्रतोद अनिल देसाई बाहेर आले. देसाई यांचा चेहरा अत्यंत त्रासलेला होता. त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना गैरहजर राहिलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचं म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे संसदीय दलाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांचा चेहरा त्रासलेला होता. आम्ही गैरहजर राहिलेल्या खासदारांना नोटिसा बजावणार आहोत. तुम्हालाा व्हिप दिला. मेल केला व्हॉट्सअप केला. तुम्हाला मिळाला. त्यावर तुम्ही काही कारणही दिलं नाही. तुम्ही काहीच सांगितलं नाही, अशी विचारणा त्यांना या नोटिशीतून करण्यात येणार असल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलं.

विचारणा करणार

कारणे दाखवा नोटीस देणार आहे. तुम्ही बैठकीला का आला नाही? याची विचारणा या खासदारांना केली जाणार आहे. आम्ही त्यांना नोटीस देत आहोत. ही एक प्रक्रिया आहे. कायद्यात ज्या तरतुदी आहेत. त्यानुसार कारवाई करू. पक्षाच्या शिस्तीनुसारच कारवाई होईल, असं देसाई यांनी स्पष्ट केलं.

असं कसं म्हणणार?

तुमचे सहा खासदार फुटले असं म्हणता येईल का? असा सवाल अनिल देसाई यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. खासदार फुटले असं कसं म्हणणार? त्यावर अंदाज लावणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कायदेशीर सल्ला घेऊनच

दरम्यान, सहाही खासदारांना आधी नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांचं उत्तर पाहून या खासदारांना बडतर्फ करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. याबाबत ठाकरे गट कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. कायदेशीर सल्ला घेऊनच पुढले पाऊल उचललं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *