एकनाथ शिंदेंची शिवसेना करणार मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले 6 खासदार पुढील.. – Marathi News | Shiv Sena Shinde faction will make major announcement within three days regarding the 6 MPs who rebelled from the Shiv Sena Thackeray faction


शिवसेना शिंदे गटाने मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला आहे. ज्याने राजकीय भूकंप आला. राज्यातील राजकारणात एका मागून एक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. 1-2 नव्हे तर शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिवसेना शिंदे गटाने फोडले आहेत. नुसते फोडलेच नाही तर थेट लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटासाठी पत्रही लिहिले. दिल्लीमध्ये घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने ही बंडखोरी टाळण्यासाठी थेट व्हिप जारी केले. मात्र, याला देखील या खासदारांनी दाद दिली नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. राजकीय धक्के एका मागून एक बसताना दिसत आहेत. दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांच्याकडून हा उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात आला. हे सर्व खासदार शिंदेंच्या गळ्याला लागली आहेत. संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देशमुख दिल्लीत आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत आहेत.

दिल्लीत मोठ्या हालचाली बघायला मिळत आहेत. यादरम्यान आता हे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात नक्की प्रवेश कधी करणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे. याबाबत मोठी अपडेट पुढे आली. पुढच्या 3 दिवसात शिंदेंची शिवसेना या खासदारांच्या पक्ष प्रवेशाबद्दल मोठी घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ही घोषणा शिवसेना शिंदे गटाकडून केली जाईल.

यादरम्यान पत्रकार परिषद घेऊन शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर नक्की कसे पार पडले, याबाबत माहिती दिली जाईल. 19 जूनलाच हे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. संख्याबळ यांच्याकडून जास्त असल्याने या 6 खासदारांपैकी एकजण गट नेता होईल, त्याबाबतची घोषणाही होईल.

उद्धव ठाकरे यांनी ज्याचा विचारही केला नाही, अशा घडामोडी दिल्लीत घडत आहेत. या 6 खासदारांना अज्ञातस्थळी हालवल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे फुटलेल्या 6 खासदारांना आजच शिवसेना ठाकरे गटाकडून नोटीस पाठवली जाईल. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, फुटलेल्या 6 खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. कारणे दाखवा नोटीस या खासदारांना पाठवली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *