Shivsena Operation Tiger : ऑपरेशन टायगर(Opration Tiger) अंतर्गत ठाकरेंनी साथ सोडण्याच्या तयारीत असलेल्या खासदार यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटू शकतात, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये, या अनुषंगाने स्थानिक पोलिसांकडून खासदारांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही काल (17 जूनला) झालेल्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित खासदारांना इशारा दिला होता. त्यानुसार खबरदारी म्हणून पोलिसांकडून संबंधित खासदार यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवल्याचे कळते आहे. मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरही मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दरम्यान, नाॅटरिचेबल असलेल्या खासदारांचा वेगळा गट होत असताना या गटाचं नेतृत्व संजय जाधव (Sanjay Jadhav)यांच्याकडे दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Sanjay Jadhav Parbhani)
Shivsena Operation Tiger : 6 खासदारांवर वेगळा गट, नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे?
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज (18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट म्हणून बघितले जात होते. परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील (Opration Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. अशातच नाॅटरिचेबल असलेल्या खासदारांचा वेगळा गट होत असताना या गटाचं नेतृत्व संजय जाधव यांच्याकडे दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, बंडखोर खासदारांनी थेट शिवसेनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला, अशी संसदीय सूत्रांची एबीपी माझाला महत्वपूर्ण माहिती दिली आहे. बंडखोर खासदारांचे अध्यक्षांना शिवसेना प्रवेशाचेच पत्र देण्यात आले. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष बंडखोरांचा प्रस्ताव मान्य करणार का याची उत्कंठा लागली आहे.
बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार- (Shivsena Opration Tiger)
बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवली जाणार आहे. ठाकरे गटाकडून तातडीने नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोटीसवर प्रत्येक खासदारांकडून उत्तर मागितलं जाणार आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी केवळ काही तासांचाच वेळ दिला जाईल. दिलेल्या वेळेत उत्तर आलं नाही, तर मग पुढे कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कारवाई करण्याचे अधिकार लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे असणार आहेत. सोबतच नव्या गटाला मान्यता देण्याचे अधिकार देखील लोकसभा अध्यक्ष यांच्याकडेच राहतील. शिवसेना दोन्ही गटांची पुढची लढाई आता लोकसभा अध्यक्षांच्या दारात जाईल. लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, याकडे आता पुढचं लक्ष असेल.
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद