भिवंडीत चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्याने 11 जणांना विषबाधा, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु


Bhiwandi News : भिवंडी शहरातील खंडू पाडा परिसरात चिकन शोरमा व पिझ्झा खाल्ल्याने 11 जणांना विषबाधा झाली आहे.  फेमस शोरमा दुकानातून चिकन शोरमा, पिझ्झा तसेच फालुदा खरेदी करून खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलटी, पोट दुखणे ,मळमळ होणे , जुलाब यांसारखे त्रास होऊ लागलेत. या विषबाधेच्या प्रकरणात 3 महिला 2 लहान मुलं आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. सर्व रुग्णांना भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी शांतीनगर पोलीस दाखल झाले आहेत. 

भिवंडीत धक्कादायक घटना घडली आहे. चिकन शोरमा व पिझ्झा खाल्ल्याने 11 जणांना विषबाधा झाली आहे. या 11 जणांना उलटी, पोट दुखणे ,मळमळ होणे , जुलाब यांसारखे त्रास होऊ लागलेत. या सर्वच जणांवर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *