भास्कर जाधव यांच्यांसारखा सिनियर माणूस कोणाला नको आहे, मंत्री उदय सामंतांचं सूचक वक्तव्य 


Uday Samant :  भास्कर जाधव यांच्यांसारखा वरीष्ठ सिनियर माणूस आम्हला मार्गदर्शन करण्यासाठी आले तर कोणाला नको आहेत, पण ते मार्गवर आहेत असे नाही असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. भास्कर जाधव जे बोलले ते योग्य आहे, बाहेरच्या लोकांपेक्षा अंतर्गत गोष्टीकडे लक्ष द्या असे सामंत म्हणाले. रोज प्रवेश होतं आहेत, दोन दिवसांनी उबाठाचे नगराध्यक्ष प्रवेश करणार आहेत. 15 कोटी 50 कोटी 100 कोटी हे आकडे देतात. आमच्या वेळी देखील घोषणा केल्यात, त्याने मनोरंजन होते, बाकीक काही नाही मतदारांनी आम्हाला स्वीकारल्याचे सामंत म्हणाले. 

महायुतीचे 11 उमेदवार निवडून येतील

महायुतीचे 11 उमेदवार निवडून येतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. नाशिकची निवडणूक गाजली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. गिरीश महाजन 4 वाजेपर्यंत आढावा घेत होते. 22 तारखेला निकाल लागल्यावर मी खुलासा करेल असं सामंत म्हणाले. आमचा उमेदवार योग्य की अयोग्य असे म्हणता येणार नाही उमेदवार योग्यच होता असे ते म्हणाले. 

एकनाथ शिंदे यांनी सर्वच मतदारांशी संवाद साधला

एकनाथ शिंदे यांनी सर्वच मतदारांशी संवाद साधला आहे. महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी त्यांनी मार्गदर्शन दिले आहे. आमचा कोथळा काढा असे म्हटले होते, त्यांना तुडवा असे बोलले आहेत. आम्ही वरळी मधून आलो लोकांनी स्वागत केले. हे फक्त शब्द प्रयोग आहे, असे होत नाही असे सामंत म्हणाले. भास्कर जाधव जे बोलले ते योग्य आहे, बाहेरच्या लोकांपेक्षा अंतर्गत गोष्टीकडे लक्ष द्या असे ते म्हणाले. भास्कर जाधव यांच्यांसारखा वरीष्ठ सिनियर माणूस आम्हला मार्गदर्शन करण्यासाठी आला तर कोणाला नको आहेत, पण ते मार्गवर आहेत असे नाही असे सामंत म्हणाले. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *