Bala Nandgaonkar : चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या महाराष्ट्रात जे फोडाफोडीचे राजकारण चालले आहे हे भविष्यासाठी घातक असल्याचे मत मनसेचे मेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले. आज तुमची चालती आहे. कुठलाही पक्ष कधीच संपत नाही.
जे चालले ते योग्य नाही
पक्ष फोडणारी लोक फोडत असले तरी फुटून जाणारी लोक आहेत. त्यामुळे सगळी अडचण झाली आहे. माझ्या दृष्टीने जे चालले ते योग्य नाही असे बाळा नांदगावकर म्हणाले. तसा पक्षाचा आदेश असेल तर मी त्या पक्षातून आलो आहे. तेव्हा छगन भुजबळ दीड दोन महिने लपून होते, तेव्हा भीती धाक दरारा होता असे बाळा नांदगावकर म्हणाले. राणे भुजबळ सोबतची लोक राहिली नाहीत, एकनाथ शिंदे बरोबरची लोक पुढे ठरवतील. गांधीजींचा म्हणजे पैशाचा वारे माप वापर सुरू असल्याचे नांदगावकर म्हणाले. या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे, या महाराष्ट्राने उत्तम प्रकारची लोक दिलेली आहेत. ज्या राज्यात राहतो त्या राज्याचा त्या भाषेचा सन्मान केला पाहिजे असे नांदगावकर म्हणाले.
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं स्पष्ट
चार वर्षानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाचा व्हीप धुडकावून 6 खासदार अनुपस्थित राहिले. हे तेच 6 खासदार आहेत जे बंडखोरी करून शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. या बैठकीला फक्त संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार हजर होते. गैरहजर खासदारांना पक्षाने नोटीस पाठवली असून 7 दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. यावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही असे दानवे म्हणाले.
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला