IPL 2027 स्पर्धेचा प्लान ठरला! या तारखेपासून स्पर्धेला सुरूवात आणि इतके सामने होणार – Marathi News | BCCI Secretary Devajit Saikia stated that the plan is to hold the IPL 2027 tournament between March 10 and May 15


IPL 2027 स्पर्धेचा प्लान ठरला! या तारखेपासून स्पर्धेला सुरूवात आणि इतके सामने होणारImage Credit source: IPL/BCCI

आयपीएल 2027 स्पर्धेसाठी बीसीसीआयने आतापासूनच जोर बैठका सुरू केल्या आहे. आयपीएलच्या 20व्या पर्वाची सुरूवात लवकर होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यासाठी एक साधारण प्लान आखल्याची चर्चा सुरू आहे. आयपीएल 2027 स्पर्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा 10 मार्च ते 15 मे दरम्यान करण्यासाठी बीसीसीआयने पावलं उचलली आहेत. सध्याची हवामानाची स्थिती पाहून बीसीसीआयने हा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे. बीसीसीआयच्या मते, खेळाडूंना तळपतं ऊन आणि असह्य उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, आयपीएल सामन्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाहीत. पुढच्या पर्वातही यंदासारखेच सामने होणार आहेत.

देवजीत सैकिया यांनी सांगितलं की…

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी आयपीएल 2027 स्पर्धेबाबत पीटीआयशी बोलताना माहिती दिली. आयपीएल 2027 स्पर्धा लवकर सुरू करण्याबाबत चर्चा आहे. आमचा प्रयत्न स्पर्धा 10 मार्च ते 15 मे दरम्यान करण्याचा आहे. यामुळे खेळाडूंना उकाड्यापासून दिलासा मिळेल. 15 मे नंतर देशातील अनेक भागात असह्य उकाडा असतो. देवजीत सैकिया यांच्या म्हणण्याप्रमाणे मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात स्पर्धा सुरू होणार असेल. मागच्या वर्षी 28 मार्चला स्पर्धेला सुरूवात झाली होती. तसेच अंतिम सामना 31 मे रोजी झाला होता. तर या स्पर्धेला आता 8 महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात आयपीएल फ्रेंचायझींमध्ये बऱ्याच घडामोडी घडताना दिसतील.

आयपीएल 2027 स्पर्धेत किती सामने होतील?

आयपीएल 2027 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. देवजीत सैकिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, बीसीसीआयचा असा कोणताही प्लान सध्यातरी नाही. पुढच्या पर्वात 74 सामने खेळले जातील. यापूर्वी 20 पर्वात 94 सामने खेळले जातील अशी चर्चा होती. पण देवजीत सैकिया यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *