Surya Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची चाल बदलणं ही ज्योतिषीय घटनेत फार महत्त्वाची घटना मानली जाते. ग्रहांचा राजा सूर्य (Surya Gochar) देव जेव्हा आपल्या नक्षत्रात बदल करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. त्यानुसार, येत्या 22 जून 2026 रोजी सूर्य देव एका नव्या नक्षत्रात एन्ट्री करणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, या बदलामुळे काही लोकांच्या नशिबाचे दार खुलणार आहेत. विशेष करुन तीन राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला ऑफिसमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचं जे काम दिर्घकाळापासून रखडलं होतं ते लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल.
सिंह रास (Leo Horoscope)
या राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे याचा सर्वात जास्त परिणाम या राशीवर दिसून येणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. जर तुमचं एखादं सरकारी काम असेल तर ते वेळीच पूर्ण होईल. तुमच्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या वागण्याचा लोक गांभीर्याने विचार करतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
या काळात तुमच्याकडे उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केलं जाईल. चांगले परिणाम मिळतील. जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ योग्य असणार आहे.
सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी काही सोपे उपाय
या काळात सूर्यदेवाला खुश करण्यासाठी तुम्ही काही छोटे-छोटे उपाय करु शकता. रोज सकाळी उठून तांब्याच्या भांड्याने सूर्यदेवाला जल अर्पण करा. सूर्यदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारच्या दिवशी आदित्य हृदय स्त्रोताचं पठण करणं फार लाभदायी मानलं जातं.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Guru Nakshatra Parivartan 2026 : अखेर आलीच ती वेळ…! गुरु-पुष्य नक्षत्रामुळे 5 राशींवर ओढावणार आर्थिक संकट, लवकरच कोसळणार दु:खाचा डोंगर, सावध व्हा
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला