Allu Arjun Son On PM MOdi Post: सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलाय. पंतप्रधान मोदींनी स्लोव्हाकिया दौऱ्यादरम्यानचा एक खास फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय . पण सध्या चर्चा वेगळीच सुरूय. या पोस्टच्या बॅकग्राऊंडला साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी ‘AA23′ चित्रपटातील थीम साँग ’23’ वापरण्यात आलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान मोदींची नेमकी पोस्ट काय?
स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी पंतप्रधान मोदींना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस’ प्रदान केला. हा सन्मान स्वीकारल्यानंतर मोदींनी त्यासंबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, “ब्रातिस्लावामध्ये ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस’ सन्मान मिळाल्याचा मला अभिमान आहे. हा सन्मान मी भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील अटूट मैत्रीला समर्पित करतो.” मात्र या पोस्टमधील फोटोपेक्षा नेटकऱ्यांचं अधिक लक्ष वेधलं ते बॅकग्राऊंड म्युझिकने. PM मोदींनी या पोस्टमध्ये अल्लू अर्जुनच्या ‘AA23’ चित्रपटातील थीम साँग वापरलं आहे. त्यामुळे या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. केवळ नेटकरी आणि चाहतेच नाही तर अभिनेता अल्लू अर्जुननेही पोस्टला लाईक करत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आलं.
विशेष म्हणजे, अल्लू अर्जुनने स्वतः पीएम मोदींच्या या पोस्टला लाईक करून प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर त्याचे काका पवन कल्याण यांची पत्नी ॲना लेझनेवा आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनीही पोस्टवर लाईक केलं आहे. याशिवाय अभिनेत्री रिद्धिमा कपूरसह अनेक सेलिब्रिटींनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या.या पोस्टनंतर अल्लू अर्जुनचे चाहते प्रचंड उत्साहित झाले आहेत.


एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “अल्लू अर्जुन खरा पॅन इंडिया स्टार आहे.” तर दुसऱ्याने म्हटलं, “140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या पोस्टसाठी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाचं म्युझिक निवडलं, ही मोठी गोष्ट आहे.”दरम्यान, ‘AA23’ चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कनगराज करत असून अल्लू अर्जुनसोबत त्यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची निर्मिती नवीन यरनेनी आणि वाई. रविशंकर करत असून तो मैथ्री मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली तयार होत आहे. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष