US Iran Peace Deal MOU: अमेरिका-इराण करार अखेर पूर्ण, दोन्ही देशांनी सामंजस्य करारावर केल्या स्वाक्षरी, ट्रम्प ओरडून म्हणाले ‘It’s signed’


US Iran Deal MOU : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Iran President Masoud Pezeshkian) यांनी दोन्ही देशांमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी एका सामंजस्य करारावर (एमओयू) औपचारिकपणे स्वाक्षरी केली आहे. अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून हा करार तात्काळ अंमलात आला आहे, अशी देखील माहिती आहे. (Pezeshkian sign MoU)  Iran’s President Masoud Pezeshkian

एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फ्रान्समधील व्हर्सायच्या राजवाड्यात मॅक्रॉन यांच्यासोबतच्या चर्चे दरम्यान अमेरिका-इराण कराराच्या छापील प्रतीवर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. स्वाक्षरी केलेल्या कराराच्या प्रती इराण आणि मध्यस्थ देशांना पाठवण्यात आल्या आहेत. यापूर्वी रविवारी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे मुख्य वाटाघाटीकार, मोहम्मद बाकेर गालिबाफ यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याने दोन्ही देशांमधील जवळपास चार महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे.

US Iran Deal MOU :  जिनिव्हा येथे चर्चा प्रस्तावित

दुसरीकडे, दोन्ही देशांचे वाटाघाटी करणारे संघ शुक्रवारी जिनिव्हा येथे एकत्र येणार आहेत. इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या बैठकीचा उद्देश करारावर स्वाक्षरी करणे नाही. तर ही बैठक प्रत्यक्षात होणार की नाही, यावर पुढील काही तासांत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. यावरून हे देखील सूचित होते की, दस्तऐवजावर डिजिटल पद्धतीने स्वाक्षरी करण्यात आली आहे, त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष स्वाक्षरी समारंभ होणार नाही.

Donald Trump : ‘ते काही आमचे पैसे नाहीत’

तात्पुरत्या शांतता कराराला पाठिंबा देण्याचा निर्णय स्पष्ट करताना, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, इराणकडे कधीही अणुशस्त्र असू नये. त्याच वेळी, त्यांनी असेही सुचवले की तेहरान युरेनियम संवर्धनाची क्षमता कायम ठेवू शकेल, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा विकास सुरू ठेवू शकेल आणि यापूर्वी गोठवलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या मालमत्तेचा ताबा पुन्हा मिळवू शकेल.

“ती मालमत्ता पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत… आम्ही त्यांचे खूप पैसे ताब्यात घेतले आहेत. ते पैसे आमच्याकडे आहेत. आम्ही ते पैसे घेतले आहेत; ते काही आमचे पैसे नाहीत, ते त्यांचेच पैसे आहेत. आणि आम्ही ते गोठवले होते. मला वाटते की, एका ठराविक टप्प्यावर आम्हाला ते परत करावेच लागतील. कारण, जर आम्ही ते परत केले नाहीत, तर भविष्यात कोणीही कधीच डॉलरमध्ये गुंतवणूक करणार नाही,” असे ट्रम्प यांनी ‘एएनआय’ (ANI) च्या वृत्तानुसार सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *