Bhiwandi Crime News : भिवंडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यास अटक करण्यात आलं आहे. ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुंबईनाशिक मार्गावरील वडपे गावच्या हद्दीत परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाला ताब्यात घेवून अटक केली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडून 27 लाखांच्या ट्रकसह तब्बल 1 कोटी 90 लाख 35 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हनुमान मोबता राम (२८) ताब्यात घेवून अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.सदर अवैध दारूची वाहतूक ही गोव्याहून राजस्थान मधील उदयपूर राज्यात होणार असल्याचे सापळा कारवाईत उघड झाले आहे.या गुन्ह्याचा तपास गुन्हयाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क भिवंडी विभागाचे निरीक्षक सुभाष एस.खंडेराय हे करत आहेत.
बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपत्रात असणाऱ्या राक्षसभुवन रेती घाटातील कथित अवैध रेती उत्खनन, वाहतूक आणि घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह 19 जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन तलाठी, एक महसूल सेवक आणि एका पोलिसासह इतर खाजगी व्यक्ती अशा 19 जणांवर गुन्हा नोंदवला गेला आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदीपात्रातून घरकुलाच्या नावाखाली 100 कोटींच्या वाळूचे उत्खनन झाल्याचा आरोप केला होता. याची वरिष्ठ पातळीवर तक्रार देखील करण्यात आली होती. त्यानंतर गेवराईचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी फिर्याद दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठीत चौकशी समितीच्या अहवालात दोषी आढळल्याने हा गुन्हा नोंद करण्यात आला. ऑगस्ट 2025 पासून राक्षसभुवन घाटातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या नावाचा वापर करून शासकीय खनिज संपत्तीची चोरी, डिजिटल डेटामध्ये छेडछाड करून फसवणूक, गोदावरी नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान आणि विद्रुपीकरण, तसेच शासकीय यंत्रणेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 199/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS), आयटी अॅक्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आणि लोकसंपत्ती नुकसान निवारण कायदा 1984 अंतर्गत विविध गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या