Last Updated:
कोरियन ब्युटी रुटीन्स प्रसिद्ध झालेत. कोरियन नागरिकांची त्वचेचं सौंदर्य, त्वचेची निगा राखण्याची पद्धती यामुळे खूप लोकप्रिय होत आहेत. कोरियन लोकांची नितळ, मऊ आणि तेजस्वी त्वचा पाहून आपली त्वचाही तशीच व्हावी अशी अनेकांची इच्छा असते. आपली त्वचाही इतकी निरोगी ठेवावी असं वाटत असेल तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरु शकते. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून काही खास उपाय यासाठी करुन पाहता येतील.
मुंबई : कोणत्याही ओटीटीवर सध्या ट्रेंड आहे कोरियन ड्रामाचा. जितकी या ड्रामाची कथा, त्यातले कलाकार प्रसिद्ध झालेत. तितकीच चर्चा आहे कोरियन ब्युटी रुटीन्सची.
सध्या कोरियन ब्युटी रुटीन्स प्रसिद्ध झालेत. कोरियन नागरिकांचं त्वचेचं सौंदर्य, त्वचेची निगा राखण्याची पद्धती यामुळे खूप लोकप्रिय होत आहेत. कोरियन लोकांची नितळ, मऊ आणि तेजस्वी त्वचा पाहून आपली त्वचाही तशीच व्हावी अशी अनेकांची इच्छा असते.
आपली त्वचाही इतकी निरोगी ठेवावी असं वाटत असेल तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरु शकते. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून काही खास उपाय यासाठी करुन पाहता येतील.
कोरियन ‘ग्लास स्किन’साठी प्रामुख्यानं तांदुळाच्या पाण्याचा वापर होतो.
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचा स्वच्छ आणि ताजीतवानी वाटू शकते.
तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी, तांदूळ काही काळ पाण्यात भिजत ठेवा.
हे पाणी गाळून घ्या आणि चेहरा स्वच्छ केल्यानंतर ‘टोनर’ म्हणून वापरा.
हा एक सोपा आणि किफायतशीर घरगुती उपाय आहे.
आरोग्यदायी म्हणजे हेल्दी स्मूदीज –
बाह्य उत्पादनांबरोबरच त्वचेची कांती उजळण्यासाठी, चांगला आहाराही महत्त्वाचा आहे. डाळिंब, ॲव्होकॅडो, चिया सीड्स आणि फ्लेक्ससीड्स म्हणजेच जवसाच्या बिया यांसारखे घटक एकत्र करून स्मूदी तयार करू शकता. ही स्मूद नियमित प्यायल्यानं त्वचेला आतून पोषण मिळण्यासाठी आणि नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.
कोरफड आणि सी-वीड म्हणजेच समुद्री शेवाळ वापरुन बनवलेला फेस मास्क –
कोरफड त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर, सी-वीडमधे विविध पोषक घटक असतात. त्वचेच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरतात.
Mumbai,Maharashtra
Glass Skin : कोरियन ग्लास स्किन हवी ? घरातल्या गोष्टींचा वापर करुन राखता येईल त्वचेची निगा, जाणून घेऊया कसा करायचा वापर
