IND vs AFG : राहुल-श्रेयसमुळे हुकलं हातात आलेलं वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडिया हाएस्ट स्कोअर करता करता राहिली! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने मोठा स्कोअर उभारला आहे, पण वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी भारतीय टीमने हातातून गमावली आहे.

राहुल-श्रेयसमुळे हुकलं हातात आलेलं वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडिया हाएस्ट स्कोअर करता करता राहिली!
राहुल-श्रेयसमुळे हुकलं हातात आलेलं वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडिया हाएस्ट स्कोअर करता करता राहिली!

लखनऊ : अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने मोठा स्कोअर उभारला आहे, पण वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी भारतीय टीमने हातातून गमावली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय टीमचा 49.5 ओव्हरमध्ये 402 रनवर ऑलआऊट झाला.

पहिले बॅटिंग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला सुरूवातीलाच धक्का बसला. यशस्वी जयस्वाल फक्त 4 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला, पण अर्धशतकाच्या जवळ असतानाच रोहित शर्माला राशिद खानने गुगलीवर बोल्ड केलं. 39 बॉलमध्ये 48 रन करून रोहित पॅव्हेलियनमध्ये परतला.

गिल-इशानची धमाकेदार शतकं

रोहितची विकेट गेल्यानंतर शुभमन गिल आणि इशान किशन यांनी अफगाणिस्तानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. शुभमन गिलने 110 बॉलमध्ये 154 रन केले, यात 2 सिक्स आणि 22 फोरचा समावेश होता. तर इशान किशनने 79 बॉलमध्ये 125 रनची खेळी केली. इशानने त्याच्या या खेळीमध्ये 7 सिक्स आणि 14 फोर मारल्या.

इशान किशन आणि शुभमन गिल यांच्या या खेळीमुळे टीम इंडिया त्यांचा वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर करेल, असं वाटत होतं, पण श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे दोघंही लागोपाठ 2 बॉलला आऊट झाले, त्यामुळे टीम इंडियाला वनडे क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर करता आला नाही. श्रेयस अय्यरने 24 बॉलमध्ये 26 रन केले, तर केएल राहुल पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला.

वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यासाठी हुकलं

वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सर्वाधिक स्कोअर 418/5 एवढा आहे. 2011 साली इंदूरमध्ये वेस्ट इंडिजच्याविरुद्ध टीम इंडियाने हा स्कोअर केला होता, जेव्हा विरेंद्र सेहवागने 219 रनची खेळी केली होती.

सीरिज खिशात टाकण्याची संधी

याआधी धर्मशालामध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्येही टीम इंडियाचा विजय झाला होता, त्यामुळे आता दुसरा सामना जिंकला तर टीम इंडियाचा सीरिजमध्येही विजय होईल. या सामन्यात भारताने टीममध्ये 3 बदल केले. नितीशकुमार रेड्डी, हर्ष दुबे आणि प्रसिद्ध कृष्णा यांना बाहेर ठेवण्यात आलं, तर यशस्वी जयस्वाल, प्रिन्स यादव आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली. प्रिन्स यादव याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

IND vs AFG : राहुल-श्रेयसमुळे हुकलं हातात आलेलं वर्ल्ड रेकॉर्ड, टीम इंडिया हाएस्ट स्कोअर करता करता राहिली!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *