खासदार फुटीनंतर गुवाहटीवरुन परतलेल्या ठाकरेंच्या निष्ठावंत आमदारांची प्रतिक्रिया, कैलास पाटील अन् नितीन देशमुख म्हणाले…


मुंबई: शिवसेनेतील पहिल्या बंडावेळी गुजरातमधून परत फिरलेले दोन आमदार होते, त्यामध्ये एक धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंबचे आमदार कैलास पाटील (Kailas patil) आणि दुसरे अकोल्यातील नितीन देशमुख. आता, शिवसेनेतील दुसऱ्या बंडानंतर, ऑपरेशन टायगरमधील ठाकरेंच्या खासदार फुटीनंतर आमदार नितीन देशमुख यांनी ‘एबीपी माझा’च्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भावनिक आणि आर्त साद घातली आहे. “पक्षाच्या खासदार आणि आमदारांच्या मताने पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी नेमू नका, हेच पदाधिकारी पुढे फुटणाऱ्या आमदारा-खासदारांसोबत पक्ष सोडून निघून जातात. पक्ष सोडून जाण्याचा विचार करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे, असे नितीन देशमुख (Nitin deshmukh) यांनी म्हटलं. 

शिवसेना पक्षात 2022 मध्ये घडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर राज्यात दोन नावं प्रामुख्याने चर्चेत आले होते. ते म्हणजे, धाराशिवमधील आमदार कैलास पाटील आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचं. आधी शिंदेंच्या गोटात गेलेल्या नितीन देशमुखांनी नाट्यमयरीत्या गुहावटीवरून शिंदेंच्या कंपूतून परतत ठाकरेंवर आपली निष्ठा व्यक्त केली होती. तसेच, कैलास पाटील हे देखील मधूनच परत आले होते. आता, या ऑपरेशन टायगरवर दोन्ही आमदारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

खासदार ओमराजेंच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलास पाटील यांना सुषमा अंधारेंनी फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले की, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यावरुन, ओमराजेंच्या फुटण्याचा अंदाज लावता येऊ शकतो. तसेच, मी माझी गॅरंटी देऊ शकतो असे म्हणत आपण आजही ठाकरेंच्या सोबतच असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी सूचवलं आहे.

नितीन देशमुख नेमकं काय म्हणाले

सध्याच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी ‘एबीपी माझा’च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंकडे मागणी केली. पक्षातील खासदार आणि आमदारांच्या मताने उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करू नये असे ते म्हणाले. आमदार खासदारांच्या मर्जीने झालेले हेच पदाधिकारी पुढे आमदार खासदारांच्या फुटीच्या वेळी पक्ष सोडून जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लवकरच यासंदर्भात उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं. पक्षाचे पदाधिकारी, आमदार खासदारांसोबत इतर पक्षात गेले नाही तर त्यांची पक्ष सोडण्याची हिंमत होणार नसल्याचंही देशमुख यांनी म्हटलं. 

दरम्यान, पक्ष सोडून जाण्याचा विचार करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत. निवडून आलेले आमदार-खासदार हे मोदी आणि भाजपच्या बळावर निवडून आलेले नाहीत. ते सर्व उद्धव ठाकरेंचा फोटो वापरून निवडून आल्याची आठवण त्यांनी फुटू पाहणाऱ्या आमदार आणि खासदारांना करून दिली. मात्र, ‘ऑपरेशन टायगर’ हे फक्त माध्यमातूनच सुरू असल्याचं ते म्हणाले. ठाकरेंच्या शिवसेनेचा कोणताही आमदार आणि खासदार फुटणार नसल्याचं  ते म्हणाले. आपल्याला गुहाटीवरून परत आल्याची आयुष्यात कधीही खंत वाटत नसून त्या कृतीचा अभिमानच वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात चुकून शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला गेला तर याला सर्वस्वी जबाबदार एकनाथ शिंदेच राहणार आहेत. तसेच, यातून निर्माण होणारा मराठी माणसांचा जनक्षोभ एकनाथ शिंदेंना सहन करावा लागेल असंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा

ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *