Team India Will Play 3 Different Matches on 17 June : 17 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्रीपर्यंत भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सामन्यांची मेजवानी असणार आहे. भारत अ संघाच्या निर्णायक लढतीपासून सुरुवात होईल, त्यानंतर वरिष्ठ भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल आणि दिवसाचा शेवट महिला विश्वचषकातील भारत-नेदरलँड्स सामन्याने होईल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना एकाच दिवशी भारताच्या तीन संघांना खेळताना पाहण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे. त्यामुळे दिवसभर क्रिकेटचा थरार अनुभवण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. आता कोणता सामना किती वाजता सुरू होणार, कुठे पाहता येणार आणि कोणते संघ आमनेसामने असतील, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया….
1) भारत ‘अ’ विरुद्ध अफगाणिस्तान ‘अ’ (India A vs Afghanistan A)
श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा मालिकेत भारत अ संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला फायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी अफगाणिस्तान अ विरुद्ध विजय आवश्यक आहे. सामना सकाळी 10.00 वाजता सुरू होईल, जो टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्हवर पाहता येईल.
भारत ‘अ’ संघ : प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, सूर्यांश शेडगे, अनुक्रम रॉय, अंशुल कंबोज, अरशद खान, विप्रज निगम, यश ठाकूर, अशोक शर्मा, कुमार कुशाग्र, निशांत सिंधू.
2) भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan 2nd ODI)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये रंगणार आहे. हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरु होईल, तसेच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार पाहता येईल.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, गुरनूर बरार, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव.
3) भारत महिला विरुद्ध नेदरलँड्स (India Women vs Netherlands T20 World Cup)
महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय महिला संघ आपला दुसरा साखळी सामना खेळणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा सामना नेदरलँड्सशी होणार असून, हा सामना जिंकून पुढील फेरीच्या दिशेने मोठे पाऊल टाकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. हा भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.00 वाजता सुरू होईल, जो स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येईल.
भारतीय महिला संघ : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, ऋचा घोष, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, श्री चरणी, राधा यादव, अरुंधती रेड्डी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला