Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; शिंदे गटाला मोठा धक्का


Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर (Mehkar) शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून, काँग्रेसच्या (Congress) 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या घडामोडीमुळे मेहकर नगरपालिकेत (Mehkar Municipal Council) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) संख्याबळ 16 वर पोहोचले असून स्पष्ट बहुमत निर्माण झाले आहे. परिणामी, शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Group) मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Buldhana News: मेहकरच्या राजकारणात मोठा ‘राजकीय भूकंप’ 

मेहकर विधानसभा (Assembly Constituency) मतदारसंघात आमदार (MLA) सिद्धार्थ खरात यांच्या विजयापासून सुरू झालेल्या राजकीय बदलांना आता अधिक वेग आला आहे. गेल्या अनेक दशकांपासून प्रभावी असलेली राजकीय मक्तेदारी मोडीत काढत ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर नगरपालिकेतील सत्तासमीकरणातही मोठे बदल झाले. आता काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी दिलेल्या अधिकृत पाठिंब्यामुळे मेहकरमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे दिसत आहे.

Buldhana News: नगरपालिकेत स्पष्ट बहुमत

काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांची एकत्रित ताकद आता 16 सदस्यांवर पोहोचली असून नगरपालिकेत महाविकास आघाडीचे निर्विवाद बहुमत तयार झाले आहे. त्यामुळे सत्तेचे समीकरण पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे. विशेषतः विरोधी शिंदे गटासाठी (Shinde Group) हा धक्का केवळ संख्याबळापुरता मर्यादित नसून भविष्यातील राजकीय अस्तित्वासाठीही मोठे आव्हान मानले जात आहे.

Buldhana News: पत्रकार परिषदेत पाठिंबा जाहीर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी 9 नगरसेवकांच्या स्वाक्षरीयुक्त समर्थनपत्रासह नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या घोषणेनंतर मेहकरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या पत्रकार परिषदेला आमदार सिद्धार्थ खरात, नगराध्यक्ष किशोर गारोळे, शिवसेना गटनेते विलास चनखोरे यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Buldhana News: या नगरसेवकांनी दिला पाठिंबा 

  1. मोहम्मद अलीम मोहम्मद ताहेर – गटनेते
  2. मंगला सुरेश मानवतकर
  3. मुजीब हसन अब्दुल हबीब कुरेशी
  4. मुजीब खानवली महम्मद खान पठाण
  5. अंजुम बानो शेख अख्तर कुरेशी
  6. शबनूर बी शेख रईस कुरेशी
  7. सुनीता संजय ढाकरके
  8. वैभव गिरीष उमाळकर
  9. नीलिमा शरद सोमण

या सर्व नगरसेवकांनी स्वाक्षरीयुक्त पत्राद्वारे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, मेहकरमधील ही राजकीय घडामोड केवळ शहरापुरती मर्यादित न राहता संपूर्ण बुलढाणा जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात झालेल्या या बदलामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *