Mangal Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत मंगळ ग्रहाचं संक्रमण; 16 जूनपासून ‘या’ 4 राशींची पाचही बोटं तुपात, बॅंक बॅलेन्समध्ये होणार दुप्पट वाढ


Mangal Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ (Mangal Gochar) ग्रहाचं कृतिका नक्षत्रात संक्रमण 16 जून 2026 रोजी म्हणजेच उद्या होणार आहे. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने ही एक फार प्रभावशाली आणि महत्त्वाची घटना मानली जाते. मंगळ ग्रहाला साहस, पराक्रम, भूमी आणि ऊर्जेचा कारक ग्रह मानतात. तर, कृत्तिका नक्षत्राचा स्वामी सूर्य ग्रह आहे. सूर्य आणि मंगळ हे एकमेकांचे मित्र ग्रह आहेत. त्यामुळे मंगळ ग्रहाच्या या संक्रमणाने अनेक राशींना लाभ मिळणार आहे. या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. कृत्तिका नक्षत्रात मंगळ ग्रहाचं आगमन झाल्याने तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, जर तुमचं एखादी सरकारी काम अनेक दिवसांपासून रखडलं असेल तर ते या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे. याच नक्षत्रात मंगळ ग्रह प्रवेश करणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या काळात समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुमच्या पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह देखील मंगळ ग्रह आहे. कृतिका नक्षत्रात येण्याने तुम्हाला चांगले दिवस येतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमचे जुने वाद मिटतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. जर तुम्हाला नवीन वाहनाची खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. 

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण भाग्यशाली ठरणार आहे. या काळात मुलांच्या कलागुणांना चांगली चालना मिळेल. सरकारी योजनांचा तुम्ही चांगला लाभ घ्या. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. नवीन गोष्टींचा स्वीकार तुम्ही कराल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा : 

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींना श्रीमंतीचे योग; आजपासून सुरु होणारा आठवडा नशीब पालटणारा, साप्ताहिक राशीभविष्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *