Ind vs Sl Tri Nation A Series : भारत-श्रीलंका मॅचमध्ये वादग्रस्त कॅचवरून राडा! अख्या लंकेला एकट्याने नडणाऱ्या सूर्यांशसोबत नेमकं काय घडलं?


Suryansh Shedge Sri Lanka A vs India A : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिंरगा ‘अ’ मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय ‘अ’ संघाने यजमान श्रीलंका ‘अ’ संघासमोर विजयासाठी 266 धावांचे आव्हान ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, मात्र अष्टपैलू सूर्यांश शेडगे आणि विप्रज निगम यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताने 49.2 षटकांत सर्वबाद 265 धावांपर्यंत मजल मारली.

टॉप ऑर्डर कोसळली, भारत संकटात

सामन्याची सुरुवात भारतीय संघासाठी खुपच खराब झाली. हुशार आणि फॉर्मात असलेले फलंदाज वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, कर्णधार तिलक वर्मा आणि निशांत सिंधू कमालीचे अपयशी ठरले. अवघ्या 123 धावांवर भारताचे 4 मुख्य फलंदाज तंबूत परतले होते आणि काही वेळातच हा स्कोअर 6 बाद 127 असा झाला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 37 धावा (42 चेंडू) करून थोडा खेळला, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. भारत अत्यंत स्वस्तात आटोपणार असे वाटत असतानाच मैदानावर युवा जोडी जमली.

सूर्यांश शेडगे आणि विप्रज निगमची झुंजार भागीदारी

भारताची ही शेवटची फलंदाजी जोडी मैदानावर होती. या दोघांनी केवळ डाव सावरला नाही, तर श्रीलंकेच्या गोलंदाजांवर प्रतिआक्रमण केले. विप्रजने 49 चेंडूत 51 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकीय खेळी खेळली. या दोघांच्या संयमी आणि तितक्याच आक्रमक खेळामुळे भारताला अडीचशे पार पोहोचता आले. तर, सूर्यांश शेडगेने 72 धावांची (66 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार) शानदार आणि परिपक्व खेळी केली. पहिल्या सामन्यात 26 (14), दुसऱ्या सामन्यात 40 (27) आणि आता तिसऱ्या सामन्यात 72 (66) धावा करत सूर्यांशने या मालिकेत आपली छाप सोडली आहे. सातव्या क्रमांकावर येत त्याने स्वतःला सर्वोत्तम फिनिशर म्हणून सिद्ध केले आहे. 

सूर्यांशच्या विकेटवर मोठा वाद

सूर्यांश ज्या पद्धतीने बाद झाला, त्यावर सध्या सोशल मीडिया आणि क्रिकेट जगतात मोठी चर्चा सुरू आहे. मोहम्मद शिराजच्या चेंडूवर लाँग-ऑनला अहानने त्याचा झेल घेतला. झेल घेताना अहानचा पाय सीमारेषेल स्पर्श करत असल्याचा संशय होता. तिसऱ्या पंचांनी अनेक रिप्ले पाहिले, पण अखेर बेनिफिट ऑफ डाऊट क्षेत्ररक्षकाला देत सूर्यांशला बाद घोषित करण्यात आले. हा निर्णय अत्यंत चुरशीचा आणि वादग्रस्त ठरला. सूर्यांश बाद झाल्यावर भारताचा डाव 49.2 षटकांत 265 धावांवर आटोपला. श्रीलंकेकडून मोहम्मद शिराजने महत्त्वाची विकेट घेतली. आता श्रीलंकेला विजयासाठी 266 धावांची गरज आहे.

हे ही वाचा –

Ind vs Pak Fight Video Fact Check : आधी गळा पकडला, नंतर धक्का दिला…; भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंचा हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल! नेमकं काय सत्य?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *