Ind vs Pak Fight Video Fact Check : आधी गळा पकडला, नंतर धक्का दिला…; भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंचा हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल! नेमकं काय सत्य?


Ind vs Pak Fight Video Fact Check Harmanpreet Kaur Fatima Sana : महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या दीप्ती शर्माला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आले. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानी कर्णधार यांच्यात थेट मैदानात भयंकर हाणामारी झाल्याचा दावा केला जात आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओमधील दावा?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एका पाकिस्तानी खेळाडूने हरमनप्रीतला काहीतरी म्हटले. यानंतर संतापलेल्या भारतीय कर्णधाराने तिचा गळा पकडला आणि तिला जोरात धक्का दिला. यानंतर पंच आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. हा व्हिडिओ भारत-पाक सामन्यानंतरचा असल्याचा दावा करत नेटिझन्सकडून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

व्हिडिओचे ‘ते’ धक्कादायक सत्य! 

या व्हिडिओची सखोल पडताळणी केली असता, हा व्हिडिओ पूर्णपणे फेक (बनावट) असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध करणारे अनेक पुरावे आहेत. जर्सी क्रमांकातील तफावत: पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिचा खरा जर्सी क्रमांक 14 आहे, मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये तिच्या जर्सीवर 55 हा क्रमांक दिसत आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांच्या (अंपायर) जर्सीचा रंग गडद लाल असतो, परंतु या व्हिडिओमध्ये तो वेगळाच (फिकट किंवा भलताच रंग) दिसत आहे. यावरून स्पष्ट होते की, डिजिटल छेडछाड करून क्रिकेट चाहत्यांची दिशाभूल करण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.

हरमनप्रीत आणि फातिमाने हस्तांदोलन का केले नाही?

या सामन्यादरम्यान आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगली. टॉसच्या वेळी हरमनप्रीत कौर आणि फातिमा सना यांनी एकमेकांशी हस्तांदोलन (Handshake) केले नाही. यामागे कोणतेही भांडण नसून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) धोरण आहे. 2025 मधील पुरुषांच्या आशिया कप स्पर्धेपासून भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘नो हँडशेक पॉलिसी’ (No Handshake Policy) स्वीकारली आहे. त्याच धोरणाचा भाग म्हणून महिला संघानेही हस्तांदोलन टाळले.

हे ही वाचा –

Ind vs Sl Tri Nation A Series : देशाची जर्सी अंगावर चढवताच आयपीएलचे हिरो ठरले झिरो, श्रीलंकेत टीम इंडियाची लाजिरवाणी दैना! प्रभसिमरन, वैभव, तिलक सर्वांनी टेकले गुडघे, नेमकं काय घडलं?





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *