Last Updated:
इराण अमेरिका युद्धविराम करारानंतर १०७ दिवसांनी होर्मुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली, डोनाल्ड ट्रम्प यांनी ती कायम टोल फ्री राहील असे जाहीर केले, क्रूड ऑइल दर घसरले
इराण विरुद्ध अमेरिका 100 दिवसांहून अधिक चालू असलेल्या युद्धसंघर्षामुळे होर्मुज बंद होता. अखेर 107 दिवसांनंतर हा युद्धसंघर्ष संपल्याची घोषणा करण्यात आली आहे. एका करारावर सह्या करून या युद्धाला विराम देण्यात आला. होर्मुज कुणाचे? त्यावर टोल लागणार की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डोनाल्ड ट्रम्प यांनी देऊन पडदा टाकला. आता होर्मुजची समुद्रधुनी संपूर्ण जगासाठी पुन्हा सुरू झाली आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये रविवारच्या अत्यंत वेगवान घडामोडींनंतर शांतता करार झाला पार पडला. दोन्ही देशांनी सर्व पातळीवर युद्धविराम केल्याची घोषणा केली. या करारानंतर जागतिक व्यापाराचा सर्वात महत्त्वाचा मार्ग मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आता जहाजांना टोल किंवा कर मोजावा लागणार का? यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट आणि अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलं.
एका वृत्तपत्राशी बोलताना, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातील सर्वात मोठ्या आर्थिक आणि व्यापारी मुद्द्याचा खुलासा केला. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या नव्या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी आता आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी कायमची टोल फ्री असेल. म्हणजेच या मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही व्यापारी जहाजाकडून कसलाही कर किंवा टोल वसूल केला जाणार नाही आणि जगाचा सागरी व्यापार विनाअडथळा सुरू राहील.
इराणच्या ‘मेहर’ वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या १४ कलमी मसुद्यानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत महत्त्वाचे नियम ठरवण्यात आल्याचं सांगितलं. इराणचा जप्त केलेला २४ अब्ज डॉलर्सचा निधी अमेरिका टप्प्याटप्प्याने मुक्त करणार आहे. यातील अर्धी रक्कम चर्चा सुरू होण्यापूर्वीच इराणला मिळणार आहे. पुढच्या ३० दिवसांत अमेरिका इराणवरील सागरी नाकेबंदी पूर्णपणे हटवणार आहे. इतकच नाही तर इराणच्या तेल आणि पेट्रोकेमिकल विक्रीवरील निर्बंधांना स्थगिती दिली जाईल असं या करारात म्हटलं आहे.
सर्वात धक्कादायक म्हणजे, अमेरिका आणि तिच्या मित्र देशांना इराणच्या पुनर्उभारणीसाठी तब्बल ३०० अब्ज डॉलर्सची मदत द्यावी लागणार आहे. युद्धात झालेली नुकसानभरपाई यामधून भरून काढली जाईल. आगामी ६० दिवस दोन्ही देशांमध्ये अणुकार्यक्रमावर चर्चा होईल, मात्र इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि स्थानिक लष्करी गटांना असलेला पाठिंबा यावर कोणतीही चर्चा होणार नाही, ही अट अमेरिकेने मान्य केली आहे.
हा करार करत असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या चर्चेला तीव्र विरोध केला होता. मात्र, ट्रम्प यांनी त्यांचा विरोध हवेत उडवून देत हा शांतता करार पूर्ण केला. ट्रम्प यांच्या मते, होर्मुझचा मार्ग सुरक्षित करणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत गरजेचे होते आणि या निर्णयामुळे त्यांनी इस्रायलला एका मोठ्या आर्थिक आणि लष्करी संकटातून वाचवल्याचा दावा ट्म्प यांनी केला.
या सगळ्यात इस्रायलला मात्र ट्रम्प यांनी जरा बाजूलाच ठेवलं आणि त्यांन सोबत न घेताच इराणशी डील केल्याने नेतन्याहून यांचा संताप झाला आहे. होर्मुज सुरू झाल्यानंतर आज शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी होतील. इतकंच नाही तर क्रूड ऑइलचे दरही घसरले आहेत. आता महागाईवर नियंत्रण मिळून थोडा दिलासा मिळेल अशी शक्यता दिसत आहे.
Mumbai,Maharashtra
Strait of Hormuz: होर्मुज सुरू होणार, पण टोल लागणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगून टाकलं
