Dhurandhar 2 OTT Verdict: रणवीर सिंहचा (Ranveer Singh) अॅक्शन स्पाय थ्रिलर सिनेमा (Action Spy Thriller Movie) ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) याच्या सीक्वेलनं थिएटर्समध्ये प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढलेत. हा सिनेमा आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर सिनेमा रिलीज होऊन कित्येक दिवस लोटलेत, तरीसुद्धा या सिनेमाची क्रेझ काही कमी होईना. आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. ‘धुरंधर 2’ (Dhurandhar 2) ओटीटीवर सर्वाधिक पाहिला जाणारा भारतीय सिनेमा ठरला असून, या बाबतीत त्यानं ‘आरआरआर’ (RRR) लाही मागे टाकलंय.
‘धुरंधर 2’साठी OTT वर विक्रमी व्यूअरशिप (Record Breaking OTT Viewership For Dhurandhar 2)
ऑफिशियल अपडेट्सनुसार, जिओहॉटस्टार (JioHotstar) वर डिजिटल रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात ‘धुरंधर 2’ ला 5 मिलियन व्ह्यूज मिळालेत. 5 जून 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt), अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि आर. माधवन (R. Madhavan) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारतीय चित्रपटासाठी ओटीटीवरील सर्वात मोठ्या सुरुवातीचा (ओटीटी डेब्यू) विक्रम या चित्रपटाने प्रस्थापित केला. ताज्या अहवालांनुसार, सर्व ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवरील एकूण डिजिटल प्रेक्षकसंख्या 70 मिलियनपर्यंत पोहोचली आहे.
‘धुरंधर 2’नं RRR ला टाकलं मागे (Dhurandhar 2 Beats RRR)
‘धुरंधर’ पूर्वी, एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) सिनेमाकडे हा मान होता. ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिलेला भारतीय सिनेमा ठरून या सिनेमानं इतिहास रचलाय. राम चरण आणि एनटीआर ज्युनियर यांची मुख्य भूमिका असलेल्या त्या सिनेमाला 50 मिलियन व्ह्यूज मिळाले होते. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर 2’नं आता तो आकडा मोठ्या फरकानं ओलांडला असून, डिजिटल क्षेत्रात भारतीय सिनेमांसाठी एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय.
‘धुरंधर: द रिव्हेंज’ बद्दल थोडसं… (Dhurandhar: The Revenge)
अॅक्शन स्पाय थ्रिलर सिनेमा ‘धुरंधर: द रिव्हेंज’मध्ये सारा अर्जुन, राकेश बेदी, गौरव गेरा, दानिश पांडोर आणि मानव गोहिल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा 2024 मधील ब्लॉकबस्टर सिनेमा ‘धुरंधर’चा सिक्वेल होता. 19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’नं पहिल्या भागाचा विक्रम मोडलाय. हा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं एकूण 1,186.32 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलंय, तर त्याचं जागतिक बॉक्स ऑफिसवरील उत्पन्न 1,850.85 कोटी रुपये इतकं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष