INDA vs AFGA : इंडिया उलटफेरची शिकार, अफगाणिस्तान विरुद्ध 349 धावा करुनही पराभूत, काय झालं? – Marathi News | tri nation a series ind vs afg afghanistan a makes big upset won by 4 runs against india dls method marathi news


क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ट्राय नॅशन ए सीरिज 2026 स्पर्धेत टीम इंडिया ए मोठ्या उलटफेरची शिकार झाली आहे. अफगाणिस्तानने भारतावर 4 धावांनी मात करत मोठा उलटफेर केला आहे. अफगाणिस्तानने या विजयासह भारताला सलग दुसऱ्या विजयापासून रोखलं आहे. भारताने या मालिकेत यजमान श्रीलंकेला पराभूत करुन विजयी सलामी दिली होती. त्यामुळे भारताला अफगाणिस्तानवर मात करुन सलग दुसरा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र अफगाणिस्तानने भारताचा 4 धावांनी गेम केला आणि आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलं.

पावसामुळे भारतीय संघाचा गेम

अफगाणिस्ताने या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. पावसाने खोडा घातल्याने काही वेळ वाया गेला. त्यामुळे 1 ओव्हर कापण्यात आली. भारताने 49 ओव्हरमध्ये 349 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 350 धावांचं आव्हान मिळालं. मात्र पावसाने दुसऱ्या डावातही खोडा घातला. त्यामुळे अफगाणिस्तानला सुधारित आव्हान मिळालं. मात्र पावसाने सामन्याची मजा घालवली. पावसाच्या सातत्यपूर्ण व्यत्ययामुळे अखेर सामन्याचा निकाल लावण्यात आला. अफगाणिस्तानला अशाप्रकारे डीएलएसनुसार 4 धावांनी विजेता घोषित करण्यात आलं. अफगाणिस्तानने 25.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 177 धावा केल्या.  अफगाणिस्तानसाठी कर्णधार इम्रान मीर याने सर्वाधिक धावा केल्या. इम्रानने 70 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह नॉट आऊट 75 रन्स केल्या. बहीर शाह याने 52 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा केल्या.

पहिला डाव, टीम इंडियाची जोरदार बॅटिंग

पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी अफगाणिस्तानच्या गोलंदांजाची जोरदार धुलाई केली. त्यामुळे भारताला 49 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतासाठी एकूण 5 फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. प्रभसिमरन सिंह याने सर्वाधिक 84 धावा केल्या. कर्णधार तिलक वर्मा आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाड या दोघांनी प्रत्येकी 66-66 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी याने 44 तर सूर्यांश शेडगे याने 40 धावांचं योगदान दिलं. तसेच अफगाणिस्तानकडून अब्दुल्लाह अहमदझई याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या.

भारताचा डीएलएसनुसार 4 धावांनी पराभव

टीम इंडियाचा तिसरा सामना केव्हा?

दरम्यान टीम इंडिया ट्राय सीरिजमधील आपला तिसरा सामना हा यजमान श्रीलंका ए विरुद्ध होणार आहे. उभयसंघातील सामना हा सोमवारी 15 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. भारतासाठी अंतिम फेरीच्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *