कंगना रणौत केंद्रीय मंत्र्यासोबत थाटणार संसार! सर्वत्र लिंकअपच्या चर्चा, मोठी अपडेट समोर – Marathi News | Kangana ranaut on marriage and linkup rumours with union minister chirag paswan


अभिनेत्री आणि भाजपच्या महिला खासदार कंगना राणौत यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत कंगना यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण त्यांनी स्वतःला फक्त बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवलं नाही, राजकारणात देखील त्यांनी प्रवेश केला आणि हिमाचल प्रदेश येथील मंडी या मतदार संघातून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आल्या. बॉलिवूड गाजल्यानंतर, राजकारणात प्रवेश केल्याने कंगना यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. आता कंगना यांना कायम विचारला जाणार प्रश्न म्हणजे, ‘लग्न कधी करणार?’ एवढंच नाही तर, केंद्रीय मंत्र्यासोबत देखील कंगना यांच्या लिंकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी लिंकअपच्या चर्चांवर आणि लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं. कंगना यांच्या लिंकअपच्या केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासोबत रंगल्या आहेत. चिराग यांना देखील कंगना यांच्याबद्दल अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले. चिराग यांच्यासोबत असलेल्या नात्यावर कंगना म्हणाल्या, ‘असं काहीही होत नाही… तुम्ही सिंगल आहात म्हणून, कोणासोबत जरी संवाद साधला तरी, नावाची चर्चा होते.’

पुढे कंगना म्हणाल्या, ‘मी माझं आयुष्य लपवून कधीच ठेवलं नाही. मी माझं आयुष्य मोकळेपणाने जगली आहे… अशात कधी लग्न करण्याची वेळ येईल, तेव्हा सर्वांना कळेल… लग्नाची वेळ आली तरी ठिक आहे आणि नाही आली तरी ठिक आहे… रिलेशनशिप्सचा मी कधी अनुभव घेतला नाही असं नाही… अशी कोणतीच गोष्ट नाही जी माझ्याकडून राहिली आहे.’

एवढंच नाही तर, ‘लग्नासाठी आई – वडिलांचा दबाव नव्हता का?’ असा प्रश्न देखील कंगना यांना विचारण्यात आला. ‘आता माझ्या 40 व्या वर्षी आई – वडील काय बोलणार आहेत. त्यांनी बोलणं केव्हाच सोडून दिलं आहे. 10 वर्षांपूर्वी ते बोलायचे लग्न कर म्हणून… पण तेव्हा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता तर काय फरत पडतो…’ असं देखील कंगना म्हणाल्या. सांगायचं झालं तर, कंगना सध्या ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमामुळे चर्चेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *