India vs Pakistan Live Streaming Women T20 World Cup 2026 : आज भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या महिला टी-20 वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात होत आहे. बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील. विश्वचषकाच्या इतिहासात या दोन संघांमधील हा एकूण नववा सामना असणार आहे. यावेळच्या विश्वचषकात एकूण 12 संघ सहभागी झाले आहेत. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा ‘ग्रुप ए’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील आपला पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
सामना कधी आणि कुठे सुरू होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा रोमांचक सामना बर्मिंगहॅम येथे खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार (IST) शाम 7:00 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
लाईव्ह सामना कुठे पाहायचा?
महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘जिओहॉटस्टार’ (JioHotstar) वर केले जाणार आहे.
फ्रीमध्ये कसा पाहायचा सामना?
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला हा सामना टीव्हीवर अगदी मोफत पाहायचा असेल, तर ‘डीडी स्पोर्ट्स’ (DD Sports) वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. येथे भारतीय चाहत्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सामन्याचा आनंद घेता येईल.
हेड टू हेड रेकॉर्ड (भारत विरुद्ध पाकिस्तान)
महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान हे संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारतीय महिला संघाने कमालीचे वर्चस्व गाजवत 6 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला फक्त 2 सामन्यांत विजय मिळवता आला आहे. एकूण टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला, तर दोन्ही संघांमध्ये 16 सामने झाले आहेत. यापैकी 13 सामन्यांत टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे, तर पाकिस्तानचा संघ फक्त 3 वेळा विजय मिळवू शकला आहे. आकड्यांवरून भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दोन्ही संघांचे Squads
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.
पाकिस्तान संघ : फातिमा सना (कर्णधार), गुल फिरोजा, आयशा जफर, इरम जावेद, ऐमान फातिमा, आलिया रियाझ, नतालिया परवेझ, सायरा जबीन, मुनिबा अली, तुबा हसन, रमीन शमीम, सादिया इक्बाल, नशरा संधू, डायना बेग, तस्मिया रुबाब.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला