BAN vs AUS T20i : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी बांगलादेश टीम जाहीर, कॅप्टन कोण? – Marathi News | Ban vs aus bangladesh squad announced for t20i series against australia litton kumer das will lead see schedule venue


ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची टी 20i मालिका नियोजित आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या टी 20i मालिकेसाठी गुरुवारी 11 जून रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. लिटन दास बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या मालिकेबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियाने बांगलादेश विरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली आहे. बांगलादेश एकदिवसीय मालिकेत 2-0 आघाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा रविवारी 14 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 17 ते 21 जून दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. बांगलादेश संघात या मालिकेनिमित्ताने वेगवान गोलंदाज तास्कीन अहमद आणि नाहीद राणा या दोघांचं कमबॅक झालं आहे.

तसेच बीसीबी (Bangladesh Cricket Board) झिंबाब्वे विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठीही संघ जाहीर केला आहे. बांगलादेश विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातील कसोटी सामना 28 जून ते 2 जुलैदरम्यान खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यात नजमुल हुसैन शांतो बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

बीसीबीकडून टी 20I सीरिजसाठी टीम जाहीर

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी बांगलादेश टीम : लिटन कुमार दास (कर्णधार), परवेझ हुसेन इमॉन, तंझिद हसन, मोहम्मद सैफ हसन, शमीम हुसेन, तौहीद हृदॉय (उपकर्णधार), काझी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, नसुम अहमद, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, नाहिद राणा आणि अब्दुल गफ्फार सकलेन.

बांगलादेश-ऑस्ट्रेलिया टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार 17 जून

दुसरा सामना, शुक्रवार, 19 जून

तिसरा सामना, रविवार 21 जून

बांगलादेश-झिंबाब्वे एकमेव कसोटी सामना, 28 जून ते 2 जुलै

झिंबाब्वे विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, तन्झिद हसन, मोमिनुल हक शोराब, मुशफिकुर रहीम, लिटन कुमेर दास, तैजुल इस्लाम, नईम हसन, सय्यद खालेद अहमद, इबादोत हुसेन चौधरी, हसन महमूद, तॉहीद हृदोय, अमित हसन आणि रोबिउल हक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *