स्ट्रॉबेरी आणि मधाचा फेस पॅक चेहऱ्यावरील हरवलेला ओलावा परत मिळवण्यास करेल मदत, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत – Marathi News | Strawberry and honey face pack will help restore lost moisture on the face know the easy method to make it


उन्हाळ्यात तीव्र ऊन, घाम आणि धुळीमुळे चेहरा अनेकदा निस्तेज आणि थकलेला दिसतो. अशावेळेस अनेकजण त्वचेला ताजे आणि आर्द्र ठेवण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय करत असतात. त्यातच स्ट्रॉबेरी आणि मधापासून बनवलेला फेस पॅक हा अशाच सोप्या घरगुती उपायांपैकी एक मानला जातो. कारण स्ट्रॉबेरीमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचेला ताजेतवाने करण्यास मदत करतात, तर मधा मधील घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरते. म्हणूनच हा फेस पॅक उन्हाळ्यात इतका लोकप्रिय आहे. तुम्हालाही त्वचेवरील कोरडेपणा कमी करायचा असेल तर स्ट्रॉबेरी आणि मधापासून बनवलेला फेसपॅकचा वापर करा. चला तर मग आजच्या लेखात आपण हा फेसपॅक कसा बनवायचा आणि त्याचे त्वचेला होणारे फायदे जाणून घेऊयात.

फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

2 ताज्या स्ट्रॉबेरी

1 चमचा मध

1 चमचा दही

फेस पॅक बनवायची सोपी पद्धत

सर्वप्रथम स्ट्रॉबेरी चांगल्या प्रकारे मॅश करा. त्याची गुळगुळीत पेस्ट बनवण्यासाठी मॅश केलेल्या स्ट्रॉबेरीमध्ये मध आणि दही मिक्स करा. जर तुम्हाला पेस्ट खूप घट्ट वाटल्यास, त्यात गुलाबपाण्याचे काही थेंब टाकून पेस्ट बनवू शकता.

त्वचेवर फेसपॅकचा वापर कसा करायचा?

स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा आणि हलक्या हाताने पुसून घ्या. स्ट्रॉबेरी मधाच हा फेस पॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर हळुवारपणे लावा. तो सुमारे 15 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. काही दिवसातच तुम्हाला याचा फरक जाणवेल.

या फेसपॅकचे फायदे काय आहेत?

त्वचेला ताजे आणि मऊ करण्यास मदत करते.

चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी हा फेसपॅक खुप उपयुक्त मानले जाते.

त्वचेवर एक सौम्य नैसर्गिक चमक दिसून येते.

या गोष्टी लक्षात ठेवा

तुमची त्वचा खूप संवेदनशील असल्यास आधी पॅच टेस्ट करा. जळजळ किंवा खाज जाणवल्यास ताबडतोब चेहरा स्वच्छ धुवा. तर हा फेसपॅक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्वचेवर लावा.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *