‘या’ लाल फळाचे रोज एक कप ज्यूस प्यायल्याने त्वचा होईल गुलाबी, जाणून घ्या त्याचे फायदे – Marathi News | Drinking a cup of juice of this red fruit every day will make your skin pink know its benefits


आपल्यापैकी अनेक महिला त्वचेची चमक वाढवण्यासाठी दर महिन्याला हजारो रूपये खर्च करून फेशियल करतात. पण कालांतराने याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो आणि त्वचेचे नुकसान होते. तर कधीकधी सुंदर त्वचेचे रहस्य महागड्या उत्पादनांमध्ये नसून तुमच्या आहारात दडलेले आहे. अशावेळेस आपला आहारा देखील निरोगी ठेवणे तितकाचं महत्वाचं आहे. तर चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी डाळिंबाच्या ज्यूसचे सेवन फायदेशीर ठरते. कारण डाळिंब हे पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना मानले जाणारे फळ आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, नियमितपणे डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने त्वचेचे आतून पोषण होते आणि चेहऱ्याची नैसर्गिक चमक वाढते. चला तर मग आजच्‍या लेखात डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने त्वचेला कोणते फायदे प्रदान होतात ते जाणून घेऊयात.

डाळिंबामध्ये पॉलीफेनॉल, अँथोसायनिन आणि इतर पॉवरफूल अँटिऑक्सिडंट्स असतात. ही संयुगे शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात. फ्री रॅडिकल्सचा संबंध त्वचेचे अकाली वृद्धत्व, निस्तेजपणा आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी आहे. म्हणूनच डाळिंबाला त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर फळ मानले जाते.

त्वचा नितळ आणि निरोगी राहण्यास होते मदत

डाळिंबातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स निरोगी त्वचा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे मानले जाते, जे त्वचा निरोगी आणि नितळ ठेवण्यास मदत करते. नियमितपणे ताजे डाळिंब किंवा त्याचा रस सेवन केल्याने त्वचेला आतून पोषण मिळण्यास मदत होते. केवळ डाळिंबाचा रस प्यायल्याने त्वचेवर त्वरित चमक येईलच याची खात्री नसली तरी, संतुलित आहारासोबत त्याचे सेवन केल्यास त्वचेच्या आरोग्यास मदत होऊ शकते.

त्वचा हायड्रेट राहते

उन्हाळ्यात त्वचेतील पाण्याचे प्रमाण सर्वात आधी कमी होते. अशावेळेस डाळिंबाचा रस शरीराला हायड्रेट करण्यास मदत करू करते. त्वचा ताजी, मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे हायड्रेशन आवश्यक आहे. जेव्हा शरीर पुरेसे हायड्रेटेड असते, तेव्हा चेहरा देखील ताजातवाना दिसू शकतो. डाळिंबामध्ये दाहशामक गुणधर्म देखील आहेत. हे गुणधर्म त्वचेतील दाह आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकतात.

या गोष्टी लक्षात ठेवा

चमकदार त्वचा केवळ एका फळावर किंवा रसावर अवलंबून नसते. पुरेशी झोप, सकस आहार, पुरेसे पाणी पिणे, नियमित व्यायाम आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून स्वतःचे संरक्षण करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. निरोगी त्वचा टिकवून ठेवण्यासाठी संतुलित जीवनशैली महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे ताज्या डाळिंबाच्या दाण्यांचा रस काढणे. अनेक पॅकेज केलेल्या रसांमध्ये अतिरिक्त साखर असू शकते, त्यामुळे ताजा रस हा एक चांगला पर्याय आहे. सकाळी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी एक ग्लास ताज्या डाळिंबाच्या रसाचा आपल्या आहारात समावेश केला जाऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *