लातूर : राज्यातील अपघातांची (Accident) मालिका सुरू असून आज पुन्हा एकदा भीषण अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाचा लातूर-नांदेड (Latur) महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघानंतर लगेच अपघात होऊन आणखी एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनाही पाचारण केले, त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नांदेड-लातूर महामार्गावर आलगरवाडी पाटीजवळील नांदेड-लातूर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालाय, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. आलगरवाडी पाटीजवळ नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोरून येणाऱ्या वॅगनर कारला आयधर ट्रकने धडक दिली. या दुसऱ्या धडकेत कारमधील एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
भंडाऱ्यात भीषण अपघात, दोन ठार
भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरून पायदळ जाणाऱ्या दोघांना भरधाव अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर अपघातास कारणीभूत असलेलं अज्ञात वाहन पळून गेलं. हा अपघात भंडारा – साकोली या राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव इथं पेट्रोलपंप समोर घडली. कुंडलिक वालदे (63) आणि भिवा बोंदले (70) या अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही भंडाऱ्याच्या धारगाव येथील रहिवाशी असून राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूनं ते फिरायला निघाले असताना हा अपघात घडला. याप्रकरणी कारधा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या