महावितरणकडून सध्या ग्राहकांना मेसेज पाठवले जात आहे. स्मार्ट मिटर बदलले जाणार असं सांगितलं जात आहे. या मेसेजमध्ये जर तुमचे मीटर ‘स्मार्ट मीटर’ नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर MSEDCL (महावितरण) किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही शुल्क महावितरणने आकारले नाही. पण, पुढे काही दर आकारले जाणार आहे का, याबद्दल कोणतीही माहिती महावितरणने दिली नाही.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कुठेही बळजबरीने महावितरणकडून स्मार्ट मिटर बसवले जाणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. पण, असं असताना आता महावितरणकडून ग्राहकांना थेट मेसेज पाठवले जात आहे.
‘महावितरण’ (MSEDCL) कडून स्मार्ट मिटर लावण्याची मोहिम सुरू केली आहे. स्मार्ट मिटर हे अचूक बिल येण्यासाठी गरजेचं आहे. स्मार्ट मिटरमुळे यापुढे घरी जाऊन रिडिंग घेण्याची गरज पडणार नाही. कर्मचाऱ्यांकडून चुकीमुळे मिटर बिल जास्त येणार नाही. तसंच तुम्ही दररोज किती विज वापरली हे तुम्हाला कळत जाईल. मिटरमध्ये छेडछाड करता येणार नाही. त्यामुळे विज चोरीला आळा बसेल.
विशेष म्हणझे, विज बिल भरलं नाहीतर महावितरणचे कर्मचारी घरी येतात आणि मिटर काढून नेतात. हे नेहमीची पद्धत झाली. पण, या पुढे स्मार्ट मिटरमुळे विज बिल जर कुणी भरलं नसेल तर मिटर काढले जाणार नाही. महावितरणकडून तुमचा विजेचा पुरवठा खंडीत केला जाईल. जेव्हा तुम्ही बिल भराल तेव्हा विज पुरवठा पुर्ववत करण्यात येईल.
प्रिय उपभोक्ता,
भारत सरकारने दि.१७.०८.२०२१ रोजी जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, जर तुमचे मीटर ‘स्मार्ट मीटर’ नसेल, तर हा संदेश मिळाल्यापासून ४८ तासांनंतर MSEDCL (महावितरण) किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींद्वारे तुमचे सध्याचे मीटर बदलून त्याऐवजी ‘स्मार्ट मीटर’ बसविण्यात येणार आहे. कृपया नोंद घ्यावी की, हा संदेश तुमचे सध्याचे मीटर बदलण्याबाबतची पूर्वसूचना आहे. स्मार्ट मीटरचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:
१) यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय अचूक बिलिंग होते.
२) मोबाईल ॲपद्वारे तुम्ही तुमच्या विजेचा वापर आणि बिल यांवर लक्ष ठेवू शकता व ते नियंत्रित करू शकता.
३) घरगुती ग्राहकांना सौरऊर्जा उपलब्ध असलेल्या वेळेत (Solar Hours) प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळेल.
४) मीटर बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
आपणास सहकार्य करण्याची आणि या सुविधेचा लाभ घेण्याची नम्र विनंती आहे.
मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
जर तुमचे मीटर अगोदर बदलविले गेले असतील किंवा बदलविण्याच्या प्रक्रियेत असतील तर सदर संदेश दुर्लक्षित करण्यात यावा.
MSEDCL (महावितरण).