मी काय तुझा नोकर आहे का? नगरसेवकाला उर्मटपणे बोलणे महागात, MSEB अधिकारी निलंबित, Audio Call ऐका! | महाराष्ट्र बातम्या


सुतगिरणी प्रभागाचे शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे यांनी महावितरणचे सहाय्यक लेखापाल शिवचरण भोसले यांना १० जून रोजी सकाळी नऊ वाजता वीज बिलासंबंधी माहिती घेण्यासाठी फोन केला असता एमईसीबीचे शिवचरण भोसले हे त्यांच्याशी उद्धटपणाने बोलले. संजय गव्हाळे यांनी शिवचरण भोसले यांच्या सोबत झालेले संभाषणाचे ऑडिओ क्लिप महावितरणकडे देत या कर्मचाऱ्यांची तक्रार केली.

या तक्रारीत या ऑडिओ क्लिप मधून महावितरणचे सहायक लेखापाल भोसले यांचा उर्मटपणा आणि उद्दामपणा दिसून आला. अखेर शिवचरण भोसले या सहाय्यक लेखापालाचे महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांनी निलंबनाचे आदेश काढले.

ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे?

शिवसेना नगरसेवक- भोसले साहेबांचा नंबर आहे का, कोण बोलतंय

MSEB अधिकारी- होय, बोलतोय

शिवसेना नगरसेवक- बोलतोय वगैरे सांगायचे नाही, समोरच्या माणसाला बोलताना सन्मान द्यायचा, कोण बोलतंय वगैरे विचारायचं

MSEB अधिकारी- तू मला शहाणपणा शिकवू नको, माझा पर्सनल नंबर आहे, मी कसं बोलायचं आणि काय बोलायचं, हे मी माझं ठरवेन, सरकारी फोनवर फोन लाव, तुला काय रिस्पेक्ट द्यायचा ते देतो, कुठला नगरसवेक आहे तू, तुझा नोकर आहे का मी..?

शिवसेना नगरसेवक- होय, तू आमचा नोकरच आहेस..

MSEB अधिकारी- तू कुणाला शहाणपणा शिकवून राहिला? आधी तू नाव गाव सांग

शिवसेना नगरसेवक- नगरसेवकासोबत बोलायची ही तुझी भाषा आहे का?

MSEB अधिकारी- तू सांगितलं का आधी नगरसेवक बोलतोय म्हणून, तू जरी नगरसेवक असला तरी मालक झाला का आमचा?

शिवसेना नगरसेवक- ठीक आहे, तुला तुझी जागा दाखवतो..

MSEB अधिकारी- जा तुला काय करायचं ते कर…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *