जगातील टॉप 5 शाकाहारी देशांची यादी जाहीर, भारत कितव्या नंबरवर? आकडेवारी पाहून थक्क व्हाल – Marathi News | Top 5 Vegetarian Countries in the World India Ranks First


जगभरात सध्या लोकांच्या आहाराच्या सवयींमध्ये वेगाने बदल होत आहे. अनेक लोक हे मासांहारी जेवणावरुन शाकाहारी जेवणाकडे वळत आहेत. त्यामुळे शाकाहारी जीवनशैलीला मोठी पसंती मिळत आहे. अशातच, जगातील कोणत्या देशात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर आता समोर आले आहे. जागतिक स्तरावर शाकाहारी जीवनशैलीच्या बाबतीत भारत देश हा पहिल्या क्रमांकावर आहे.

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ३० ते ४० टक्के लोक पूर्णपणे शाकाहारी आहार घेतात. या आकडेवारीनुसार, देशातील सुमारे २७.६ कोटी लोक शाकाहारी आहेत. भारतात शाकाहाराची मुळे प्राचीन काळापासून हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माच्या परंपरांशी जोडलेली आहेत. भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पनीर टिक्का, दाल मखनी, डोसा आणि भाजी-रोटी यांसारखे चव आणि पोषणाने भरपूर असलेले अनेक शाकाहारी पर्याय रोजच्या आहारात समाविष्ट आहेत.

जगातील टॉप ५ शाकाहारी देश कोणते?

भारत : भारतात तब्बल ३० ते ४० टक्के लोकसंख्या पूर्णपणे शाकाहारी आहे. प्राचीन धार्मिक परंपरा, अहिंसेचे विचार आणि देशातील समृद्ध खाद्यसंस्कृती यामुळे भारत या यादीत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

मेक्सिको : सामान्यतः मांसाहारी खाद्यसंस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मेक्सिकोने सर्वांनाच थक्क केले आहे. या देशातील सुमारे १८ टक्के (२.३८ कोटी) लोकसंख्येने शाकाहार स्वीकारला असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्राण्यांचे कल्याण आणि पर्यावरणाविषयी वाढलेली जनजागृती हे यामागचे मुख्य कारण आहे.

ब्राझील : जगातील सर्वात मोठ्या मांस उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक असलेल्या ब्राझीलमध्ये १४ टक्के (सुमारे २.८ कोटी) लोक शाकाहारी बनले आहेत. पशुपालनासाठी होणारी अवाढव्य जंगलतोड रोखण्यासाठी येथील नागरिक शाकाहाराकडे वळत आहेत. ब्राझीलच्या साओ पावलो या शहरात शाकाहारी रेस्टॉरंट्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

तैवान : बौद्ध धर्मातील कारुण्य आणि अहिंसेच्या तत्त्वांनी प्रेरित असलेल्या तैवानमध्ये १३ ते १४ टक्के लोकसंख्या मांसाहार टाळते. येथील तरुण पिढी फिट राहण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शाकाहारी जीवनशैलीचा मोठ्या प्रमाणात स्वीकार करत आहे.

इस्रायल : ज्यू धर्मीय नैतिक मूल्ये आणि प्राण्यांविषयीच्या दयेमुळे इस्रायलमधील १३ टक्के लोकसंख्या शाकाहारी झाली आहे. इस्रायलमधील तेल अवीव हे शहर तर जगाची शाकाहारी राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील हुमुस आणि फलाफेलसारखे शाकाहारी पदार्थ जगभर प्रचंड लोकप्रिय आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *