Rohit Sharma: रोहित शर्मा याची नवी इनिंग, ब्रँड ॲम्बेसिडर ते गुंतवणूकदार, दमदार नवीन खेळी – Marathi News | Team India former captain Rohit Sharma new innings from brand ambassador to investor a powerful new move fitness App Fittr


Rohit Sharma Investment: भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियाचा हिटमॅन अशी ओळख असलेला रोहित शर्मा याने एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. आता या कंपनीत तो केवळ ब्रँड ॲम्बेसिडर नाही तर एक गुंतवणूकदार म्हणूनही समोर आला आहे. त्याने त्याची नवीन इनिंग सुरू केली आहे. या फिटनेस स्टार्टअपचे नाव FITTR असे आहे. रोहित शर्मा इक्विटी पार्टनर झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्याने या कंपनीत किती गुंतवणूक केली हे मात्र समोर आलेले नाही.

काय करते हे स्टार्टअप?

FITTR एक फिटनेस आणि वेलनेस स्टार्टअप आहे. डिजिटल कोचिंग, पोषण आहाराविषयीचे मार्गदर्शन, कम्युनिटी सपोर्ट, वैयक्तिक प्रशिक्षण अशा सेवा ही कंपनी पुरवते. कंपनीने यापूर्वी रोहित शर्मा याला ब्रँड ॲम्बेसिडर केले आणि आता त्यानेच या कंपनीत मोठी गुंतवणूक केल्याने या फिटनेस कंपनीची लोकप्रियता वाढली आहे.

रोहितची नवी इनिंग

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, FITTR ने नवीन घडामोडीविषयी माहिती दिली आहे. रोहित शर्मा याची मोठी मदत आणि सहकार्य मिळाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ब्रँड ॲम्बेसिडर ते एक गुंतवणूकदार आणि इक्विटी पार्टनर असा प्रवास प्रेरणादायी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने तो सोबत आल्याने आनंद झाल्याचे म्हटले आहे.

रोहित शर्माच्या मते, गुंतवणुकीपूर्वी त्याने कंपनीचे बिझनेस मॉडल समजून घेतले. भविष्यातील संधींचा जवळून अभ्यास केला. त्यानंतर या फिटनेस स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा याच्या म्हणण्यांनुसार, फीटरच्या टीमसोबत राहून बिझनेस मॉडल समजून घेतले. कंपनीच्या वृद्धीचा विचार केला. कंपनीचा पाया मजबूत आहे. त्यानंतर गुंतवणुकीचा निर्णय घेणे सोपे गेल्याचे रोहित शर्मा म्हणाला. कंपनीचे कार्यालय पुण्यात आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने 128 कोटींचा महसूल मिळवला होता.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. ही केवळ माहिती आहे. कुठल्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *