England vs Sri Lanka ICC Women’s T20 World Cup 2026 : महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेची सुरुवात इंग्लंड महिला संघाने दमदार विजयासह केली. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात इंग्लंडने 87 धावांनी विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली. या सामन्यात इंग्लंडने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारून नवा विक्रमही आपल्या नावावर केला.
डॅनी वायट-हॉजचे झंझावाती शतक (England beat Sri Lanka by 87 runs)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 20 षटकांत 1 बाद 219 धावा केल्या. सलामीवीर डॅनी डब्ल्यू-हॉज हिने अवघ्या 62 चेंडूत नाबाद 105 धावांची तुफानी खेळी साकारली. तिच्या या खेळीत 13 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 132 धावांवर गारद झाला आणि इंग्लंडने 87 धावांनी सामना खिशात घातला. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सामन्यात इंग्लंडने महिला टी-20 विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या करून इतिहास रचला.
महिला टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या
इंग्लंडने केलेल्या 219 धावा या महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्या ठरल्या आहेत. विशेष म्हणजे याआधीचाही हा विक्रम इंग्लंडच्याच नावावर होता. 2023 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांनी 5 बाद 213 धावा केल्या होत्या.
इंग्लंड – 219/1 विरुद्ध श्रीलंका (2026)
इंग्लंड – 213/5 विरुद्ध पाकिस्तान (2023)
दक्षिण आफ्रिका – 195/3 विरुद्ध थायलंड (2020)
भारत – 194/5 विरुद्ध न्यूझीलंड (2018)
एका सामन्यात तब्बल 351 धावा
या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी मिळून एकूण 351 धावा केल्या. महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील एका सामन्यात झालेली ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या ठरली. या यादीत अव्वल स्थान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2018 मध्ये झालेल्या सामन्याचे आहे. त्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 354 धावा केल्या होत्या. श्रीलंकेने आणखी केवळ 4 धावा केल्या असत्या, तर हा विक्रम मोडला गेला असता.
फ्रेया केम्पची विक्रमी कामगिरी
इंग्लंडची युवा गोलंदाज फ्रेया केम्प हिने आपल्या टी-20 विश्वचषक पदार्पणातच 4 बळी घेत शानदार कामगिरी केली. विश्वचषक पदार्पणाच्या सामन्यात 4 विकेट्स घेणारी ती जगातील तिसरी आणि इंग्लंडची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. यापूर्वी 2010 मध्ये इंग्लंडच्या डॅनी वायटने पदार्पणाच्या विश्वचषक सामन्यात 4 बळी घेतले होते. भारताची डायना डेविड हिचाही या विशेष यादीत समावेश आहे. तिने 2010 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडने फलंदाजी, गोलंदाजी आणि विक्रमांच्या जोरावर महिला टी20 विश्वचषक 2026 ची सुरुवात दणक्यात केली असून, स्पर्धेतील इतर संघांसाठी त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला