ENGW vs SLW : इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, कॅप्टनबाबत मोठी अपडेट काय? – Marathi News | Icc t20i womens world cup 2026 eng vs sl sri lanka won toss and elected bowling against england see playing 11


आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील (Icc Womens T20i World Cup 2026) सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका (ENG vs SL) आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. चमारी अट्टापट्टू हीच्याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार चमारीने फिल्डिंगचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे श्रीलंकेचे गोलंदाज यजमान इंग्लंडला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इंग्लंडला पहिल्या सामन्यातच धक्का, नक्की काय झालं?

इंग्लंडला या पहिल्याच सामन्यात मोठा झटका लागला आहे. इंग्लंडची कॅप्टन नॅट सायव्हर ब्रँट हीला स्पर्धेतील काही सामन्यात फक्त फलंदाज म्हणून खेळावं लागणार आहे. नॅट ही बॉलिंग ऑलराउंडर आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून टीम मॅनेजमेंटने नॅट काही सामन्यात फक्त स्पेशालिस्ट बॅट्समॅन म्हणूनच खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा काही प्रमाणात फटका आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना कोण जिंकणार ?

दरम्यान श्रीलंका आणि इंग्लंड या दोन्ही संघांची हा टी 20I क्रिकेटमध्ये आमनेसामने येण्याची ही 13 वी वेळ आहे. इंग्लंडने याआधी 12 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेला केवळ 2 सामन्यांतच इंग्लंडवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इंग्लंडचा चेजिंगचा निर्णय

इंग्लंड वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनी व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कॅप्टन), एलिस कॅप्सी, हेदर नाइट, फ्रेया केम्प, डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ आणि लॉरेन बेल.

श्रीलंका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : विश्मी गुणरत्ने, चमारी अट्टापट्टू (कॅप्टन), इमेषा दुलानी, हर्षिता समरविक्रमा, हंसिमा करुणारत्ने, कविशा दिलहारी, निलाक्षीका सिल्वा, कौशानी नुथ्यांगना (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, मलकी मदारा आणि मिताली अयोध.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *