साऊथ सुपरस्टार रामचरणचा बहुप्रतिक्षित ‘पेड्डी’ हा चित्रपट 4 जून 2026 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे, त्यामुळे बॉलिवूडमध्येही त्याची चर्चा आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केली आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘पेड्डी’ने पहिल्याच दिवशी जगभरात कमाईचा तब्बल 100 कोटी रुपयांचा टप्पा पार रेला आहे.