‘दृश्यम 3’च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?


October Movie Releases: ऑक्टोबर महिना सुरू झालाय. सिनेप्रेमींसाठी हा महिना खास ठरणार आहे. या 31 दिवसांत बॉलिवूडपासून हॉलिवूड आणि साऊथ इंडियन सिनेमापर्यंत अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहेत. ऑक्टोबरमध्ये ॲक्शन, थ्रिलर, कॉमेडी, हॉरर आणि रोमँटिक ड्रामाचा जबरदस्त डोस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तुम्ही या महिन्यात थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर आगामी रिलीजची ही यादी नक्की पाहा.

थिएटरमध्ये रिलीज होणारे बॉलिवूड चित्रपट

दृश्यम 3 – अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ 2 ऑक्टोबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू आणि जयदीप अहलावत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दृश्यम 3'च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?

प्रेम कीटाणु– कॉमेडी-ड्रामा ‘प्रेम कीटाणु’ देखील 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. अपूर्व सिंह कार्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून वीर पहाडिया, आफिया सय्यद, अपारशक्ती खुराना, राकेश बेदी आणि निखिल विजय यांच्या भूमिका आहेत.

दृश्यम 3'च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?

उड़ता तीर – आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांचा स्पाय-कॉमेडी ड्रामा ‘उड़ता तीर’ 9 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

दृश्यम 3'च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?

नई नवेली -यामी गौतम ‘नई नवेली’मधून कॉमेडीसोबत हॉररचा तडका देताना दिसणार आहे. हा चित्रपट 16 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

दृश्यम 3'च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?

प्रहार: द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्जवल निकम – उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये राजकुमार राव आणि वामिका गब्बी प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 16 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

दृश्यम 3'च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?

पहला प्यार दूसरी बार -लव रंजन यांचा रोमँटिक-कॉमेडी ड्रामा ‘पहला प्यार दूसरी बार’ 23 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटातून काही नव्या कलाकारांना लॉन्च केले जात आहे.

तुम मेरे हो -ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी यांचा रोमँटिक ड्रामा ‘तुम मेरे हो’ देखील 23 ऑक्टोबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आशीष पांडा यांनी केले आहे.

साऊथ इंडियन चित्रपट

विश्वंभरा – चिरंजीवी, त्रिशा कृष्णन आणि कुणाल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला तेलुगू चित्रपट ‘विश्वंभरा’ 16 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

रणबाली – विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा पीरियड ॲक्शन ड्रामा ‘रणबाली’ 16 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जेलर 2 – रजनीकांत यांच्या ‘जेलर’चा बहुप्रतिक्षित सीक्वेल ‘जेलर 2’ देखील ऑक्टोबरमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट 15 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

हॉलिवूड चित्रपट

स्ट्रीट फायटर ॲक्शन-थ्रिलर : ‘स्ट्रीट फायटर’ 16 ऑक्टोबरला भारतीय सिनेमागृहात दाखल होणार आहे.

क्लेफेस -हॉरर-थ्रिलर – ‘क्लेफेस’ 23 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात टॉम राइस हॅरिस, नाओमी अकी आणि डेव्हिड डेंसिक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ऑक्टोबरमध्ये ॲक्शन, कॉमेडी, हॉरर, थ्रिलर आणि रोमँटिक सिनेमांचा जबरदस्त मेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *