डी-मार्टमधील अवघ्या 20 रुपयांच्या वस्तूवर महिलांचा अघोषित बहिष्कार; महागड्या वस्तू घेतील पण… – Marathi News | Dmart women boycott carry bag charges court order


पगार झाल्या झाल्या महिला आणि पुरुषांचा मोर्चा डीमार्टकडे वळत असतो. डीमार्टमधून लागणाऱ्या किराणापासून ते कपड्यांपर्यंत… आदी वस्तूंची खरेदी केली जाते. कधी कधी खरेदी करताना आवश्यक नसलेल्या वस्तूही खरेदी केल्या जातात. काही वेळा एकच वस्तू डबल खरेदी केली जाते. ऐनवेळी कमी पडायला नको म्हणून जास्तीची वस्तू खरेदी केली जाते. या खरेदीसाठी 5 ते 10 हजार रुपये मोजले जातात. पण गृहिणी डी-मार्टमधून शक्यतो एक वस्तू खरेदी करत नाहीत. अवघ्या 20 रुपयांची ही वस्तू आहे, पण गृहिणी ही वस्तू खरेदी करत नाहीत. 20 रुपये वाचवण्यासाठी महिला कंजुषी करत असतात. त्या वस्तूचं नाव ऐकून तुम्हीही चक्रावून जाल.

डीमार्टमध्ये आल्यावर साखरेपासून तेल साबणापर्यंत आणि गहू, तांदूळ, पोहे, कोलगेट आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी केल्या जातात. घरात महिन्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची यादी करूनच गृहिणी डीमार्टला येतात. प्रत्येक वस्तू भाव आणि क्वालिटी पाहून खरेदी करतात. मुलांसाठी लागणाऱ्या वस्तूही खरेदी करतात. कपडे, बूट, वह्या, पुस्तकांपासून टेडी बियरपर्यंत ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या सर्व खरेदी करतात. त्याची किंमत कितीही महाग असली तरी मागेपुढे पाहत नाहीत. आवश्यक वस्तू असल्याने त्या खरेदी केल्या जातात.

पण ती वस्तू खरेदी…

गृहिणी घरातून निघताना सोबत कॅरी बॅग अर्थात मोठी पिशवी घेऊन जातात. अतिरिक्त पैसे जाऊ नये म्हणून त्या पिशवी न्यायला विसरत नाहीत. डी मार्टमध्ये प्लास्टिक, कपड्याची वा पेपर कॅरिबॅगसाठी अतिरिक्त पैसे वसूल केले जातात. पिशवीच्या आकारानुसार 12 रुपयांपासून ते 20- 25 रुपयांपर्यंत पैसे आकारले जातात. लहान, मध्यम, थोडी मोठी आणि अधिक मोठी अशा पिशव्या डी मार्टमध्ये असतात. पिशव्यांच्या आकारानुसार पैसे आकारले जातात. पण महिला हे 20-25 रुपये वाचवण्यासाठी घरूनच पिशवी घेऊन येतात. त्या शक्यतो डी मार्टमध्ये पिशव्या खरेदी करत नाहीत. फुकटचे पैसे कशाला घालवायचे? म्हणून त्या सोबत पिशव्या ठेवतात. बहुतेक महिला हेच करतात. जणू काही त्यांचा मॉलच्या पिशव्यांवर अघोषित बहिष्कारच असतो. संसारासाठी पै पै वाचवण्यावर त्यांचा भर असतो. जी गोष्ट घरात आधीच आहे, त्यावर पैसे का खर्च करा? असं साधंसोपं लॉजिक या मागचं असतं.

पैसे देण्याची गरज नाही

दरम्यान, देशभरातील दुकानात खरंतर कॅरीबॅगसाठी पैसे देण्याची गरज नसते. पण तरीही तुमच्याकडून कॅरीबॅगचे पैसे वसूल केले जातात. देशभरात कॅरीबॅगसाठी 3 रुपयांपासून 15 रुपयांपर्यंत वसूल केले जातात. तुम्ही ग्राहक संरक्षण न्यायालयाच्या निवाड्याचा हवाला देऊन किंवा निकालाची कॉपी दाखवून कॅरीबॅगचे पैसे घेण्यापासून दुकानदार, मॉल, डी मार्टवाल्यांना रोखू शकता. हैद्राबादच्या आकाश कुमार यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने हा महत्त्वाचा निकाल दिला. मे 2019मध्ये मी 602 रुपयांचं सामान खरेदी केलं. त्यानंतर हैदरनगरच्या डी-मार्टने कॅरीबॅगसाठी माझ्याकडून 3.50 रुपये घेतले, असा दावा आकाश कुमार यांनी याचिकेत केला होता. त्यावर कोर्टाने अशा पद्धतीने कॅरी बॅगसाठी पैसे वसूल करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा दिला. कोर्टाने ग्राहक संरक्षण आयोगाला तसे आदेशच दिले होते. त्यामुळे तुम्हीही खरेदीसाठी जात असाल तर पिशवीचे पैसे आकारल्यास कोर्टाची कॉपी दाखवून ही वसूली रोखू शकता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *