Gold Price Today : नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याची गुड न्यूज, उच्चांकापेक्षा सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील भाव पाहिलेत का ? – Marathi News | Know gold silver price today 1st June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune maharshtra


जून महिन्याची पहिली तारीख आणि नवा आठवडा आज एकत्रच सुरू झाला असून सोमवार 1 जून रोजी देशांतर्गत सोन्याच्या किमती खाली घसरल्या आहेत. आज 1 जून रोजी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर कमी होऊन 1,57,180 प्रति 10 ग्रॅम झालेत. तर मुंबई 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,57,030 रुपये इतका आहे. गेल्या आठवड्यात, 24-कॅरेट सोन्याच्या दरात 2020 ने घट झाली. 22 -कॅरेट सोन्याच्या दरात 1850 रुपयांनी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4527.36 डॉलर्स इतका आहे.

रुपयाच्या तुलनेत डॉलरचे बळकटीकरण, कच्च्या तेलाच्या किमतींमधील वाढ आणि अमेरिका व इराण यांच्यातील शस्त्रसंधी कराराबाबतची अनिश्चितता या सर्वांचा सोन्याच्या किमतींवर दबाव आला आहे. गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहेय. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 2 टक्क्यांहून अधिक वाढून प्रति बॅरल 93 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

देशातील काही महत्वाच्या शहारीतल सोन्याचे रेट्स

चांदीचे दर किती ?

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही आठवड्याच्या पहिल्या दिवशीच घसरण झाली. सोमवार, 1 जून रोजी सकाळी चांदीचा भाव 2,79,900 रुपये प्रति किलोग्राम होता. गेल्या आठवड्यात भावात 5000 रुपयांची घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव 75.54 रुपये प्रति औंस आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात देशांतर्गत चांदीच्या भावाने 4 लाख रुपये प्रति किलोग्रामचा टप्पा ओलांडला होता. मात्र आता चांदीचे दर 3 लाखांच्या खाली आहेत. देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव असतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *