Katrina kaif Body Shaming Trolling: अभिनेत्री कटरिना कैफ (Katrina kaif) सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे. बाळ झाल्यानंतर पहिल्यांदाच कटरीना विकी कौशलसोबत गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात दिसली होती. बाळाच्या जन्मानंतर पहिलाच पब्लिक अपिअरन्स असल्यामुळे साहजिकच चाहत्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं. अनेकांनी सोशल मिडीयावर तिच्या वाढलेल्या वाजनावरून टीका केली. कटरिनाचं बरंच बॉडी शेमिंग (Body Shaming) झालं. अनेकांनी तिच्या प्रेग्नंसीआधीचे आणि नंतरच्या फोटोशी तुलना करणाऱ्या पोस्ट केल्या. दरम्यान, मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी कटरिनाच्या बाजूने भूमिका घेत ट्रोलर्सला सुनावलं. यात हृतिक रोशनसह अनेक महिला अभिनेत्रींच्या पोस्ट चर्चेत होत्या. आता खुद्द कटरिना तिच्या पोस्ट प्रेग्नंसीवर व्यक्त झालीय.
कटरिनावर होणाऱ्या बॉडी शेमिंगवर सोशल मीडियावर टीका
कटरिनावर होणाऱ्या बॉडी शेमिंगवर सोशल मीडियावर टीकेची राळ उठली आहे. अनेक स्त्री कलाकारांसह पुरुष कलाकारही कटरिनाच्या शरिरावर, प्रेग्नेंसी नंतर वाढलेल्या वजनावर कमेंट करणाऱ्या ट्रॉलर्सला सुनावताना दिसत आहेत. एखाद्या महिलेच्या शरीरावर टिप्पणी करणाऱ्यांवर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केलीय. एखाद्या महिलेचं वजन किती वाढलं, कमी झालं, त्यांचं वय किती झालं, तुम्ही कशा दिसता तुमच्या शरीर कसा आहे तुमची त्वचा कशी दिसते याचा हिशोब का द्यावा? आपल्या शरीरावर आपलाच अधिकार असला पाहिजे असं म्हणत अनेकांनी कतरिनाला बॉडी शेम करणाऱ्यांना सुनावलं.
Hrithik Roshan deserve all the flowers. He liked this post supporting Katrina Kaif on instagram. pic.twitter.com/JC4e3BjnUh
— r (@bekhayalime) September 18, 2026
Some pieces of shit are trolling Katrina Kaif today over her looks and beauty, and honestly, they seem to have forgotten who they’re talking about.
Katrina Kaif isn’t just some normal actress. She is a WHOLE ERA.
An automatic queen whose name alone is enough. An idol to… pic.twitter.com/38mGHDmFZz
— 🐦𝒕𝒘𝒆𝒆~ 🎀🐘 (@HarryTripathi10) September 15, 2026
दरम्यान, अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत कटरिनाने मातृत्वानंतर तिच्या शरीरात, त्वचेत काय बदल झाले? स्वतःपलीकडे पाहण्याचा दृष्टीकोन अशा अनेक विषयावर ती व्यक्त झालीय. ‘हॉलीवुड रिपोर्टर इंडिया’ ला दिलेल्या मुलाखतीत कटरिना बोलत होती.
गरोदरपणानंतर झालेल्या बदलावर स्पष्टच बोलली कटरिना…
बॉलीवूडमध्ये आल्यापासून ‘सर्वात उत्तम दिसणं’ याबद्दलची माझी व्याख्या बरीच बदलली आहे.असं कटरिना कैफने सांगितलं. ती म्हणाली ‘ गरोदरपणानंतर माझी त्वचा अधिक संवेदनशील झाली होती.माझ्यासाठी तू काळ अतिशय आव्हानात्मक होता.कारण माझ्या त्वचेसाठी कोणती उत्पादन योग्य आहे ते मला शोधून काढावं लागत होतं. मी अशी उत्पादने शोधत होते जी माझ्या त्वचेला शांत करतील. माझ्या त्वचेचा आरोग्य पूर्वीसारखं करण्यास मदत करतील.
ती म्हणाली, ‘जेव्हा मी मॉडलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं, त्यावेळी सौंदर्याचे काही ठराविक निकष होते. पण आता ‘उत्तम दिसणं’ यापेक्षा ‘ आतून सर्वात उत्तम वाटणं’ याकडे आपण आलो आहोत.आतून छान वाटण्यासाठी मी स्वतःची पूर्णपणे काळजी घेते. ‘ असं कटरिना म्हणाली.
कटरिना स्वतःची काळजी कशी घेते?
स्वतः ची काळजी घेण्यासाठी कटरिना संतुलित आहार, शरीरातील इन्फ्लमेशन कसं संतुलित ठेवता येईल असा प्रयत्न करते. ऍक्टिव्ह राहणं मेडिटेशन सकाळी एक तास फोन पासून दूर राहणं आणि उठल्या बरोबर नैसर्गिक सूर्यप्रकाशात थांबणं या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर खूप सकारात्मक परिणाम होत असल्याचं ती म्हणाली. याचा प्रभाव माझ्या त्वचेवरही दिसून येतो. जेव्हा तुम्ही आतून निरोगी असतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआपच तुमच्या बाह्य व्यक्तिमत्त्वातून दिसून येतो. ‘असंही तिने सांगितलं.